Eco friendly bappa Competition
घर क्राइम पॅराग्लायडिंग करताना 400 फुटांहून कोसळून साताऱ्यातील पर्यटकाचा मृत्यू

पॅराग्लायडिंग करताना 400 फुटांहून कोसळून साताऱ्यातील पर्यटकाचा मृत्यू

Subscribe

पॅराग्लायडिंग करताना हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूरज संजय शाह (30) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. सूरज संजय शाह हा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करत होता.

पॅराग्लायडिंग करताना हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूरज संजय शाह (30) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. सूरज संजय शाह हा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करत होता. त्यावेळी पॅराग्लायडिंग करत असताना त्याचा 400 फुटांवरून कोसळल्याने मृत्यू झाला. (Suraj Shah Tourist Of Satara Death In Himachal Pradesh While Paragliding)

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी गावाजवळ पॅराग्लायडिंग करताना ही घटना घडली. शनिवारी ही घटना घडली असून, सूरज संजय शाह याच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पायलट विमल देव यांना अटक केली आहे. तसेच, त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत बॉम्ब चक्रीवादळ; बर्फाळ वाऱ्यांमुळे हवाई उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज संजय शाह याच्यासह चार जणांचा एक गट कुल्लू येथे आला होता. यावेळी त्यांनी पॅराग्लायडिंग राईड बुक केली होती. त्यावेळी त्यांची एक मैत्रिण शाह यांच्या आधी पॅराग्लायडिंग राईडवर गेली आणि तिला सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात आले. त्यानंतर, सूरज शाहला पॅराग्लायडिंगसाठी नेले. त्यावेळी टेकऑफ करत असताना तो जवळपास 300 ते 400 फूट उंचीवर असताना जमिनीवर कोसळला. यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, सूरजच्या मृत्यूनंतर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. त्यानुसार, पोलीस सध्या सूरजचा उड्डाणादरम्यान हार्नेसचा सुरक्षा बेल्ट कसा उघडला याचा तपास करत आहेत. स्टेशन हाऊस ऑफिसर राजीव लखनपाल यांनी अपघाताच्या कारणाबद्दल आम्हाला तज्ञांचे मत घ्यावे लागेल अशी माहिती दिली आहे.


हेही वाचा – 2023 मध्ये पृथ्वीवर होणार आण्विक हल्ले; बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरेल का खरी?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -