घरदेश-विदेशमेहुल चोक्सीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी

मेहुल चोक्सीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी

Subscribe

गुजरातचा मेहुल चोकसी या विद्यार्थ्याने पंचतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडी केली आहे. 'लिडरशीप अंडर गव्हर्नमेंट - केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी' या विषात त्याने पीएचडी केली आहे.

गुजरात राज्यातील सुरत येथील एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोकसी असे आहे. विशेष म्हणजे गुजरातचा एक हिरे व्यापारी लाखो रुपयाचे कर्ज काढून विदेशात पळून गेला आहे. त्याचे नावदेखील मेहुल चोकसी असेच आहे. परंतु, या मेहुल चौकसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृतसंस्थेने माहिती दिली आहे. मेहुल चोकसीने नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ येथे राज्यशास्त्रात एमए केले आहे. त्यानंतर त्याने ‘लिडरशीप अंडर गव्हर्नमेंट – केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी’ या विषात पीएचडी केली आहे.

‘४८ टक्के लोकांना वाटतं मोदी पॉलिटिकल मार्केटिंग करतात’

मेहुल चोक्सने सांगितले की, ‘पंतप्रधानांवर पीएचडी करण्यासाठी ४५० लोकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये सरकारी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि नेतेमंडळी यांचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्तीला मी ३२ प्रश्न विचारले. यादरम्यान, माझ्या लक्षात आले की, २५ टक्के लोकांना नरेंद्र मोदींचे भाषण आवडते. ४८ लोकांना वाटतं की, मोदी पॉलिटिकल मार्केटींग चांगली करतात.’ मेहुलने वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या कला विभागाच्या निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पीएचडी पूर्ण केल्याचे सांगितले. २०१० साली त्याने नरेंद्र मोदींवर पीएचडी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

- Advertisement -

‘५१ टक्के लोकांनी सकारात्मक उत्तर दिले’

मेहुल चोकसी म्हणाला की, ‘मी लोकांना मोदींच्या यशस्वी नेतृत्वासंदर्भात प्रश्न विचारले तर ५१ टक्के लोकांनी सकारात्मक उत्तर दिले. तर ३४.२५ टक्के लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. ४६. ७५ टक्के लोकांनी सांगितलं की, लोकप्रियता मिळवण्यासाठी नेत्याने जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले पाहीजे. ८१ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, देशाचा पंतप्रधान होण्यासाठी सकारात्मक नेतृत्त्वाची गरज असते. ३१ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, नेत्याने खरं बोलणं महत्त्वाचं आहे, तर ३५ टक्के लोकांचं म्हणंण आहे की, नेत्याचा पारदर्शक कारभार राहणं फार जरुरीचं आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -