Survey On Digital Currency : क्रिप्टोकरन्सीची देशभरात चर्चा, किती भारतीयांचा आहे विश्वास?

सर्व्हेमध्ये धक्कादायक आकडा समोर...

क्रिप्टोकरन्सीची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सरकर सुद्धा या प्रश्नावर विचारविनिमय करत आहे. याचदरम्यान एक लोकल सर्कल्स सर्व्हे समोर आला आहे. ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीबाबत देशातील लोक या विषयाचा सखोल अभ्यास करताना दिसत आहेत. सर्व्हेमध्ये आता धक्कादायक आकडा समोर आला आहे. दुसरा भारतीय क्रिप्टोकरन्सीच्या पक्षात नाहीये. डिजिटल मुद्राला व्हॅलिड करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात ७६ टक्के लोकांचा सहभाग आहे. क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्वेक्षणात ७१ टक्के भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिप्टोकरन्सीवर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. त्यापैकी ५१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भारत सरकारच्या डिजिटल मुद्रेला लॉन्च करण्यात यावं. तर ५४ टक्के भारतीयांचं म्हणणं आहे की, सरकार क्रिप्टोकरन्सीला व्हॅलिड करू नये. २६ टक्के लोकांना क्रिप्टोकरन्सी हवी आहे. परंतु त्यावर टॅक्स लावण्यात यावा.

सर्व्हेक्षणात ८७ टक्के भारतीय कुटुंबियाला क्रिप्टोमध्ये ट्रेडिंगचा समावेश नाहीये. परंतु ७४ टक्के लोकांना वाटतंय की, क्रिप्टोकरन्सीबाबत कोणत्याही प्रकारची जाहीरात दिली जात नाही. केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात एक बिल तयार करण्याच्या मार्गावर आहे. मागील काही दिवसांपूर्वी आरबीआयने क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत याच मुद्द्यावर बैठक झाली.

तज्ज्ञांचा दावा आहे की, एप्रिलमधील २०२० मध्ये भारतातील डिजिटल मुद्रा ९२३ मिलिअन डॉलर होती. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये ६.६ बिलिअन डॉलर पर्यंत पोहोचला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, देशात क्रिप्टोकरन्सी जवळ लोक आकर्षित होत आहेत. परंतु ७० ते ८० टक्के भारतीय ५०० ते १००० रूपयांपर्यंत गुंतवणूक करताना दिसत आहेत.


हेही वाचा: कळवा भागातील पाणी प्रश्न निकाली लागणार, जलवाहिनीसाठी २.४३ कोटींचा निधी मंजूर