घरदेश-विदेशसर्वेक्षण : भारतात इंटरनेटचा वापर करण्यात महिला पिछाडीवर, लिंग भेदाचं प्रमाण वाढलं

सर्वेक्षण : भारतात इंटरनेटचा वापर करण्यात महिला पिछाडीवर, लिंग भेदाचं प्रमाण वाढलं

Subscribe

नवी दिल्ली – भारतात स्त्री शिक्षणाचं महत्त्व आणि स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चा सुरू असताना एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करण्यात भारतातील महिला मागे असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. ‘इंडिया इनइक्वालिटी रिपोर्ट २०२२ डिजिटल डिवाइड’ (India Inequality Report 2022: Digital Divide) मध्ये हे निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण १५ टक्क्यांनी आणि इंटरनेट वापरण्याचं प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी आहे.

हेही वाचा – धक्कादायक! भारताचे आठ माजी नौसैनिक तीन महिन्यांपासून कतारमध्ये कैदेत

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत भारतात डिजिटल इंडियाचा प्रसार जोरात झाला. शिक्षणापासून व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ग्रामीण भागातही इंटरनेटचं जाळं पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोबाईल, संगणक आदी उपकरणांच्या किंमती अटोक्यात आल्याने इंटरनेटचा वापर जगभरात वाढला आहे. मात्र, असं असतानाही भारतात महिलांकडून इंटरनेटचा वापर अल्प प्रमाणात होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

भारतात लिंग भेदाचं (Gender Gap) प्रमाण ४०.४ टक्के असल्याचंही निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. स्त्री-शिक्षणाचा प्रसार झालेला असतानाही स्त्री-पुरुष असमानता वाढल्याने चिंता व्यक्त केली जातेय. या अहवालात ग्रामीण आणि शहरी भागात झालेल्या डिजिटलायजेशनवरही नोंदी करण्यात आल्या आहेत. एका वर्षात १३ टक्के डिजिटल वृद्धी दर नोंद करण्यात आली असली तरीही ३१ टक्के ग्रामीण जनता शहरी लोकांच्या तुलनेत इंटरनेटचा वापर करत नाही. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२१ या काळात केलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – श्रद्धा हत्याकांडाची बिहारमध्ये पुनरावृत्ती, भर बाजारात जिवंत महिलेचे केले तुकडे

महाराष्ट्र आघाडीवर

इंटरनेट वापरण्यात महिला मागे असताना महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात येत असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे. यानंतर गोवा, केरळ, बिहार, छत्तीसगढ, झारखंड असा अनुक्रमे क्रमांक लागतो. एनएसएस २०१७-१८ अनुसार, केवळ नऊ टक्के विद्यार्थ्यांकडेच इंटरनेट आणि संगणकाचे माध्यम उपलब्ध होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -