Surya Grahan 2021: यंदाचे पहिले सूर्यग्रहण आज ‘या’ वेळेत लागणार; जाणून घ्या यावेळेत काय करावे?

surya grahan 2021 is tomorrow know surya grahan timing
Surya Grahan 2021: यंदाचे पहिले सूर्यग्रहण उद्या लागणार; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही

यंदाचे २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) आज आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण असून ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीला झाकेल. अशात सूर्याच्या बाह्य छटा दिसतील. या ग्रहणा दरम्यान सूर्याचा जवळपास ९४ टक्के भाग चंद्र व्यापेल म्हणजेच ग्रहण लागेल. पूर्ण सूर्यग्रहण असल्यामुळे आज दिवसा सर्वत्र अंधार पसरेल. यावेळी कोरोनाच्या काळात सूर्यग्रहण आले आहे. भारतात हे सूर्यग्रहण अंशतः रुपात असणार आहे. यामुळे ग्रहण काळ मान्य होणार नाही म्हणजे सुतक लागणार नाही असे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात, युरोप आणि अशियामध्ये अंशतः ग्रहण असेल. पूर्ण सूर्यग्रहण उत्तर कॅनडा आणि ग्रीनलँड आणि रशियामध्ये होईल.

सूर्यग्रहणाची वेळ

वर्षातील पहिले सूर्यग्रहण दुपारी १ वाजून ४२ मिनिटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असेल. पण यंदा भारतात ग्रहणाचा सुतक काळ मान्य नाही आहे.

सूर्यग्रहणा दिवशी काय करू नये? काय करावे? असे मानले जाते

  • सूर्यग्रहणाच्या वेळी घरा बाहेर पडले नाही पाहिजे. यादरम्यान लोकांनी घरी राहणे योग्य मानले जाते. तसेच काही लोकांचे मते सूर्यग्रहण पाहिल्यानंतर अंघोळ केली पाहिजे असे आहे.
  • तसेच सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणत्याही झाड्यावरून पानं, फूलं, लाकडं तोडली नाही पाहिजे. शिवाय केस आणि कपडे देखील धुतले जाऊ नयेत.
  • सूर्यग्रहणा दरम्यान कोणते शुभ काम किंवा नव्या कामाची सुरुवात करू नये.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी दुसऱ्या व्यक्तीचे जेवण खाल्ल्यास, १२ वर्षांची सर्व मिळवलेले पुण्य नष्ट होते असे मानले जाते. तसेच यादरम्यान गुरुमंत्र, इष्टमंत्र किंवा देवाच्या नावाचा जप अवश्य करावा.
  • ग्रहणाच्या वेळी पुण्याचे काम करण्यास सांगितले जाते. यावेळी जर गायीला गवत, पक्ष्यांना अन्न आणि गरजूंना कपडे दिले तर यामुळे पुण्य मिळते.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. तसेच यादरम्यान उपवास केला तर त्याचे चांगले परिणाम होतात.
  • असे मानले जाते की, सूर्यग्रहण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अन्न आणि पाणी घेतले नाही पाहिजे.