घरताज्या घडामोडीsurya grahan 2022: वर्षाचे पहिले खंडग्रास सूर्यग्रहण, वेळ काय ? कुठे दिसणार...

surya grahan 2022: वर्षाचे पहिले खंडग्रास सूर्यग्रहण, वेळ काय ? कुठे दिसणार ?

Subscribe

शनिवार ३० एप्रिल रोजी वर्षातील पहिले असे सूर्य ग्रहण असणार आहे. यंदाचे सूर्य ग्रहण हे अनेक बाबतीत महत्वाचे असे असणार आहे. या ग्रहणाच्या निमित्ताने अनेक योग घडणार आहेत. भारतीय वेळेनुसार ३० एप्रिलला मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सूर्य ग्रहणाला सुरूवात होईल. १ मे सकाळी ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत हे सूर्य ग्रहण असणार आहे. हे खंडग्रास सूर्य ग्रहण आहे. हिंदू पंचागानुसार हे ग्रहण वैशाख महिन्यातील अमावस्येला असणार आहे.

नासाच्या माहितीनुसार ३० एप्रिलला ग्रहणाच्या दरम्यान सूर्याचा ६४ टक्के हिस्सा चंद्रामुळे झाकला जाईल. यंदाच्या वर्षातील पहिले ग्रहण हे ३० एप्रिलला आणि दुसरे ग्रहण २५ ऑक्टोबरला असणार आहे. या ग्रहणाच्या सुरू होण्याची वेळ ही रात्री १२ वाजून १५ मिनिटे असणार आहे. तर पहाटे ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रामुळे अवघा एक अंश इतकाच सूर्याचा प्रकाश बाधित होणार आहे.

- Advertisement -

भारतात कुठे दिसणार सूर्यग्रहण

यंदाचे सूर्यग्रहण हे अंटार्कटिकाचे अतिरिक्त अटलांटिक क्षेत्र, प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण पश्चिमी भागात दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात या ग्रहणाचा धार्मिक प्रभाव असणार नाही. त्यामुळे या काळात वैदिक नियम पाळू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रहणाच्या आधी सामान्यपणे सूतक काळ लागू होतो. पण भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने सूतक काळ पाळण्याची गरज नसल्याचे हिंदू पंचांगामध्ये नमूद करण्यात आले आहे.

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?

नासाच्या माहितीनुसार सूर्य ग्रहण तेव्हा होते, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो. पृथ्वीवर या काळात सावली पडते. या काळात सूर्याचा संपूर्ण प्रकाश झाकोळला जातो. पण खंडग्रास सूर्यग्रहणात आंशिक रूपाने सूर्य झाकला जातो. त्यामुळे सूर्य अर्धचंद्राकार परिस्थितीत आढळतो. खंडग्रास सूर्यग्रहण असल्यानेच चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत नसतील.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -