घरताज्या घडामोडीरिया चक्रवर्तीच्या घरावर नार्कोटिक्सचा छापा; मुंबई पोलिसांसोबत झाडाझडती सुरु

रिया चक्रवर्तीच्या घरावर नार्कोटिक्सचा छापा; मुंबई पोलिसांसोबत झाडाझडती सुरु

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एनसीबीची टीम रियाच्या घरी दाखल झाली आहे. रिया – शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून एनसीबीच्या पाच सदस्यांकडून झाडाझडती सुरु आहे. यावेळी मुंबई पोलीसही एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान, एनसीबीची दुसरी टीम सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडाच्या घरी पोहोचली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

- Advertisement -

रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यात संवाद

दरम्यान, तपास यंत्रणांना रियाच्या मोबाइलमधून डीलीट करण्यात आलेले मेसेज मिळाले होते. या मेसेजमध्ये रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यात अमली पदार्थाबाबत संवाद होते. रियाचा भाऊ शौविकचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.


हेही वाचा – LIVE UPDATES: रिया चक्रवर्तीच्या घरावर नार्कोटिक्सचा छापा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -