सुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली…

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

sushant singh rajput sister shweta demand justice request to pm narendra modi
सुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. या आरोपानंतर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

काय म्हणाली सुशांतची बहिण?

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण असून मला आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा करते’, असे म्हणत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे.

‘नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. विशेष म्हणजे ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. त्यामुळे तुम्ही याप्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही, अशी मी विनंती करते’.


हेही वाचा – Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा! फोटो व्हायरल