घरताज्या घडामोडीThe Kashmir Files : फक्त 'द काश्मीर फाईल्स'वरच नाही तर गुजरात फाईल्सबद्दलही...

The Kashmir Files : फक्त ‘द काश्मीर फाईल्स’वरच नाही तर गुजरात फाईल्सबद्दलही बोललं पाहिजे : सुशीलकुमार शिंदे

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुजरात दंगलीवर एका पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकाला द काश्मीर फाईल्स इतकंच प्रसिद्धी दिली जावी, असे म्हटलं आहे. या मुद्द्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट मी पाहिलेला नाहीये. पण बरेच लोक त्याबद्दल बोलत आहेत. परंतु द काश्मीर फाईल्सच्या आधी पत्रकार राणा अयूब यांचे गुजरात फाईल्स (अ‍ॅनाटॉमी ऑफ कव्हर-अप) हे पुस्तकही आहे, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर लोकं द काश्मीर फाइल्सचा प्रचार करत आहेत, त्यांनी गुजरात फाईल्सबद्दलही बोलायला हवं. कोणत्याही घटनाक्रमांचा विपर्यास करणं चुकीचं असल्याचं शिंदे म्हणाले. दरम्यान, झोपडपट्टीतील फुटबॉल खेळाडूंना दाखवणाऱ्या झुंड चित्रपटाबद्दल त्यांनी वक्तव्य केलं.

द काश्मीर फाईल्स या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर आता विवेक अग्निहोत्री दिल्लीतील दंगलीवर आधारित चित्रपट बनवणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडच्या संस्कृतीवर मोकळेपणाने भाष्य केले. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्यात अजिबात रस नाही, असं देखील अग्निहोत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

द काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यापेक्षा विवेक अग्निहोत्री यांना तो YouTube वर टाकण्यास सांगा,असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. परंतु त्यांच्या या विधानावरून बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मित्रांनो चित्रपटगृहात जाऊनच द काश्मीर फाइल्स बघा. ३२ वर्षांनंतर #KashmiriHinds चे दु:ख समजले आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार समजून घ्या. त्यांच्याशी सहानुभूती दाखवा, पण जे लोक या शोकांतिकेची चेष्टा करत आहेत. कृपया त्यांना तुमच्या शक्तीची जाणीव करून द्या, असं अभिनेता अनुपम खेर म्हणाले.


हेही वाचा : उद्यापासून आंतरराष्ट्रीय विमाने सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -