घरदेश-विदेशनळावरची भांडणं 'ट्विटर'वर, सुषमा-सोनम ट्विटवॉर

नळावरची भांडणं ‘ट्विटर’वर, सुषमा-सोनम ट्विटवॉर

Subscribe

सध्या सुषमा स्वराज आणि टीव्ही पॅनलिस्ट सोनम महाजनमध्ये ट्विटवॉर सुरु आहे. पासपोर्ट प्रकरणावरुन सोनमने सुषमा यांना ट्विटरवर टार्गेट केले. या दोघांच्या ट्विट वॉरनंतर सुषमा स्वराज यांनी अखेर सोनम महाजनला ब्लॉक केले.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अॅक्टिव्ह असतात.पाण्यासाठी नळावर जशी भांडण होतात, अगदी तशीच नळावरची भांडणे सध्या ट्विटरवर होत असतात. सध्या सुषमा स्वराज आणि टीव्ही पॅनलिस्ट सोनम महाजनमध्ये ट्विटवॉर सुरु आहे. पासपोर्ट प्रकरणावरुन सोनमने सुषमा यांना ट्विटरवर टार्गेट केले. या दोघांच्या ट्विट वॉरनंतर सुषमा स्वराज यांनी अखेर सोनम महाजनला ब्लॉक केले. विशेष म्हणजे हे देखील त्यांनी ट्विट करुन सांगितले.

काय झाली टिवटिवाट

सुषमा स्वराज यांना टीव्ही पॅनलिस्ट सोनम महाजनने एक ट्विट केले. हे ट्विट लखनऊमधल्या पासपोर्ट संदर्भातील होते. सोनमने बेजबाबदार कामाचा नाहक फटका अधिकारी विकास मिश्रा यांना बसला. तिने ट्विट करत म्हटल आहे की, ‘ये गुड गवर्नेंस देने आए थे. ये लो भाई, अच्छे दिन आ गए हैं. सुषमा स्वराज जी, मैं आपकी फैन थी और आपको गाली देने वालों से लड़ी थी. अब आप प्लीज मुझे भी ब्लॉक कर दीजिए, इनाम दीजिए, इंतजार रहेगा.’ याला सुषमा स्वराज यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले, उन्होंने एक लाइन ‘इंतजार क्यों? लीजिए ब्लॉक कर दिया. असा रिप्लाय त्यांनी दिला.

- Advertisement -

 

- Advertisement -

नेमके झाले काय?

लखनऊमधील एका दांपत्याने धर्म बदलण्याच्या नावावरुन पासपोर्ट नाकारल्याचा तमाशा केला. तन्वी सेठ आणि अनास सिद्दकी अशी त्यांची नावे होती आणि त्यांनी झालेला सगळा प्रकार ट्विटवरुन त्यांनी सुषमा स्वराज यांना सांगितला. तातडीने दुसऱ्या दिवशीच तन्वी सेठ यांना पासपोर्ट देण्यात आला आणि अशी गैरवर्तणूक करणारे अधिकारी विकास शर्मा यांची बदली करण्यात आली. पण या पासपोर्ट प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. यात हे दांपत्य दोषी असल्याचे आढळले आणि दिलेला पासपोर्ट रद्द करण्यात आला. पण आता या ट्विटरवॉरमुळे हे भांडण नळाच्या भांडणासारखीच वाटत आहेत.

वाचा- सुषमा स्वराज झाल्या ‘ट्रोल’

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -