घरताज्या घडामोडीCoronavirus: दिल्लीमध्ये करोना संशयिताची आत्महत्या

Coronavirus: दिल्लीमध्ये करोना संशयिताची आत्महत्या

Subscribe

तनवीर सिंग हा सिडनीहून परत आला होता. आज रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करोना संशयिताने रुग्णालयातून उडी मारत आत्महत्या केली आहे. तनवीर सिंग असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तनवीर सिंग हा सिडनीहून परत आल्यानंतर त्याला आज रात्री ९ वाजता सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तनवीर सिंग याला करोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती देवेंद्र आर्य, पोलिस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) यांनी दिली.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करुन त्याला निरीक्षणा खाली ठेवण्यात येत आहे. सध्या देशात करोनाचे १४७ रुग्ण आहेत. मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. सिंगापूरमध्ये महाराष्ट्राचे ५० विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि विनायक राऊत यांच्या मार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल, असे महाराष्ट्राचे माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – करोनामुळे दादर, माहीम आणि धारावी परिसरात कोणती दुकानं कधी बंद राहणार? वाचा!


देशात सर्वाधिक महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आहेत. सध्या राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोकणात पहिला करोनाचा रुग्ण आढळला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -