फक्त एका किंचाळीने होणार ३ मिनीटात कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा दावा

देशभरासह जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र सध्या कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारा वेळ आणि पैसे या दोन्हींचा बचाव होण्यासाठी डचच्या एका संशोधकाने शोधलेली पद्धत चांगलीच चर्चेत आहे. ही चाचणी अतिजलद आणि सोपी पद्धत असल्याचेही त्यांनी दावा केला आहे. या संशोधकाचे नाव पीटर वॅन वीज असे असून त्यानं एअरलॉक कॅबिनचा शोध लावला आहे. या कॅबिनमध्ये जाऊन केवळ व्यक्तीला किंचाळायचे आहे किंवा एखादं गाणं म्हणायचे आहे. या एअरलॉक कॅबिनच्या माध्यमातून व्यक्तीला कोरोना झाला आहे किंवा नाही याचे निदान होणार असल्याचा या संशोधकाचा दावा आहे.

कोरोना व्हायरसची नागरिकांमध्ये आधीच भीती असताना भयानक स्वॅब टेस्ट करून घेण्यास नागरिक अनेकदा चिंतेत असल्याचे पाहिला मिळतेय. स्वॅब टेस्टसह नोजल टेस्ट ही काहीजणांना आवडत नाही, त्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ही एअरलॉक कॅबिनची टेस्ट चांगली आणि सोयिस्कर असल्याचा दावा याच्या संशोधकाने केला आहे. या एअरलॉक कॅबिनच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट अतिजलद आणि सोपी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

असे होते कोरोनाचे निदान

पीटर वॅन वीज यांनी सांगितले की, या एअरलॉक केबिनमध्ये कोरोना व्हायरसचे पार्टिकल्सचे नॅनोमीटर स्केल सायझिंग डिव्हाईसच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते आणि केवळ तीन मिनीटात आपल्याला कोरोना आहे का नाही याचा परिणाम समोर येतो. हे एअरलॉक कॅबिन शाळा, एयरपोर्ट, कन्सर्ट, कार्यालय या ठिकाणी उपयुक्त असल्याचा दावा संशोधकाने केला आहे.