Google-Apple ला तगडी टक्कर देण्यासाठी स्वदेशी ‘BharOS’ सज्ज! जाणून घ्या वैशिष्ट्ये

Indian Mobile Operating System: गेल्या काही दिवसांत गुगल आणि अ‍ॅपल कंपन्या आपला मनमानी कारभार करून भारत देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतू आता या दोन्ही कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी भारताची स्वदेशी मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम सज्ज झालीय.

Made-In-India-Operating-System-Bharos
(Pic Credit- Twitter/ Dharmendra Pradhan)

प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंचावरणारी ही बातमी आहे. देशातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल आणि अ‍ॅपल यासारख्या विदेशी कंपन्यांची मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम राज्य करतेय. यात या दोन्ही कंपन्या आपआपल्या परीने चांगला बिझनेसही करतायत. अशात गेल्या काही दिवसांत गुगल आणि अ‍ॅपल कंपन्या आपला मनमानी कारभार करून भारत देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु आता या दोन्ही कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी भारताची स्वदेशी मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम सज्ज झालीय.

‘BharOS’ असं या स्वदेशी मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टमचं नाव आहे. आज याची चाचणी करण्यात आलीय. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज BharOS ची चाचणी केली. ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आयआयटी मद्रासने तयार केली आहे. त्यामुळे अ‍ॅपल आणि गुगल यासारख्या कंपन्यांची चिंता वाढू शकते.

या मोबाईल ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचं एक खास वैशिष्ट्य आहे. हे सॉफ्टवेअर व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर इन्स्टॉल करता येऊ शकतं. याचा जवळपास १०० कोटी मोबाईल युजर्सना फायदा होईल, असा दावा देखील करण्यात येतोय. तसंच हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर उर्वरित OS पेक्षा अधिक सुरक्षित असणार आहे.

या स्वदेशी मोबाईल फोन ऑपरेटींग सिस्टीमच्या चाचणी प्रसंगी बोलताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या प्रवासात अनेक अडचणी येतील आणि जगभरात असे अनेक लोक आहेत जे अशा अडचणी आणतील. अशी स्वदेशी सिस्टीम यशस्वी व्हावी अशी त्यांची इच्छा नाही. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आणि चिकाटीने प्रयत्न करून ती सिस्टीम यशस्वी करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे.”

जाणून घेऊयात या स्वदेशी मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीमचे खास वैशिष्ट्ये:-

  • या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टममध्ये युजर्स गुगल क्रोम, जी-मेल, युट्यूबसारखे डिफॉल्ट अ‍ॅप त्यांच्या गरजेनुसार हटवू शकतात.
  • सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जी-मेल, क्रोम, यूट्यूब सारखी अ‍ॅप्स Google आणि iOS सॉफ्टवेअरमध्ये बाय डीफॉल्ट आहेत, जे युजर्स त्यांना हवे असले तरीही काढू शकत नाहीत. यामुळे युजर्सच्या मोबाईल अ‍ॅपसाठी बरीच स्पेस मिळणार आहे.
  • मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी युजर्सना प्रतीक्षा करावी लागते. परंतु BharOS वरून युजर्सना वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध करून दिले जाऊ शकतात.
  • सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांना ओएससाठी गुगलवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत गुगलकडून मनमानी शुल्क वसूल केले जाते. परंतु BharOS लॉंच झाल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीही कमी होऊ शकतात.
  • अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. अ‍ॅप-मधील बिलिंगवर कर आकारला जाऊ शकतो.
  • सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, BharOS ही अशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्यावर युजर्सचं नियंत्रण जास्त असेल. हव्या त्या अ‍ॅप्सना युजर्स आपल्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्सेस देऊ शकतात.