UP elections 2022 : माझा राजीनामा भाजपला धक्का देण्यासाठी पुरेसा – स्वामी प्रसाद मौर्य

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीआधी भाजपमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मौर्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षातून समाजवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान, माझा राजीनामा भाजपला धक्का देण्यासाठी पुरासा असल्याचं वक्तव्य भाजपचे तत्कालीन मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.

राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ

स्वामी प्रसाद मौर्यांनी राजीनामा दिल्यानंतर योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपला जोरदार धक्का देण्यासाठी माझा राजीनामाच पुरेसा आहे. अजूनपर्यंत भाजपामधून मी राजीनामा दिलेला नाहीये आणि मी समाजवादी पक्षात सुद्धा प्रवेश केलेला नाहीये. परंतु मी लवकरच भाजपामधून राजीनामा देणार आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे, असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.

भाजपला रिजेक्ट केलंय…

मी भाजपला रिजेक्ट केलंय. त्यामुळे भाजपामध्ये पुन्हा एकदा वापसी करण्याचा सवालच उपस्थित होत नाही. भाजपला धक्का देण्यासाठी माझा राजीनामाच पुरेसा आहे. जनतेचं हितं लक्षात घेऊनच मी राजकारणात मोठा निर्णय घेतला आहे. तसेच हा माझा अंतिम निर्णय आहे. याआधी मौर्यांनी आपला राजीनामा ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला. मात्र, अद्यापही त्यांनी समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश केलाय की नाही, याबाबची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे.

चार आमदारांचा राजीनामा 

मागील काही दिवसांपासून स्वामी प्रसाद मौर्य भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली होती. त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरच मौर्यांनी भाजपला झटका देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. तसेच यूपीमधून भाजपचे एक मंत्री आणि चार आमदारांनी राजीनामा देत भाजपला दणका दिला आहे.


हेही वाचा : Assembly Election 2022 : यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश