लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार – रामदेव बाबा

योगगुरू बाबा रामदेव नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. नुकताच बाबा रामदेव यांनी पाकिस्तानबाबत एक वक्तव्य केले आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ramdev baba

योगगुरू बाबा रामदेव नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. नुकताच बाबा रामदेव यांनी पाकिस्तानबाबत एक वक्तव्य केले आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. तसेच, लवकरच बलुचिस्तान पीओके आणि सिंध प्रदेश भारतात विलीन होईल आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून राहील’, असे बाबा रामदेव यांनी म्हटले. (Swami Ramdev Said Very Soon Pakistan Will Be Divided And Baluchistan POK Will Be Merged With India)

प्रजासत्ताक दिनानिमित्त हरिद्वार येथील पतंजली योगपीठावर राष्ट्रध्वज फडकवताना स्वामी रामदेव यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. पाकव्याप्त काश्मीरही भारतात विलीन होईल. पंजाब सिंध प्रांतही भारतात विलीन होईल आणि बलुचिस्तानही भारतात विलीन होईल. भारत महासत्ता बनेल ही काळाची हाक आहे आणि ते लवकरच होणार आहे, असे रामदेव यांनी म्हटले आहे.

शिवाय, ‘देशात धार्मिक दहशतवाद सुरू असून, सनातन संस्कृतीचा ऱ्हास करणे हा ज्यांचा उद्देश आहे, अशा लोकांना कडाडून विरोध केला पाहिजे’, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले.


हेही वाचा – भारतातील पहिली नोजल कोविड लस उपलब्ध; जाणून घ्या किंमत किती?