स्विगीने ३८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

सर्व उपलब्ध पर्याय शोधल्यानंतर आम्ही हा अत्यंत कठीण निर्णय घेत आहोत. या सर्व कर्मचाऱ्यांबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. पुनर्रचनेचा भाग म्हणून कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा एक कठीण निर्णय आहे. आम्ही आमच्या ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

four-day work week for Swiggy employees from Month of May

नवी दिल्लीः फुड डिलिव्हरी कंपनी स्विगीने त्यांच्या ३८० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांत बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंदीचे सावट जगावर आहे. स्विगीने केलेली कर्मचारी कपात त्याचाच एक भाग मानला जात आहे.

व्हेंचर फंडिंग मार्केटच्या अडचणींचे कारण देत स्विगीने कर्मचारी कपात केली आहे. ३८० कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, सर्व उपलब्ध पर्याय शोधल्यानंतर आम्ही हा निर्णय घेत आहोत. या सर्व कर्मचाऱ्यांबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. पुनर्रचनेचा भाग म्हणून कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा एक कठीण निर्णय आहे. आम्ही आमच्या ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जगभरातील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर सध्या मंदीचे सावट दिसून येत आहे. याचा फटका मात्र लाखो कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय. गेल्या वर्षी ट्विटर, अॅमेझॉन, मेटानंतर जगप्रसिद्ध पेप्सिको या मोठ्या कंपनीनेही कर्मचारी कपात करण्याचा विचार सुरु केला होता. यामुळे पेप्सिकोमधील शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आता जाणार आहेत. त्याची अधिकृत घोषणा झाली नव्हती. मात्र सन २०२२ मध्ये नॅशनल पब्लिक रेडिओनेही नोकऱ्यांवर मर्यादा घातली आहे तसेच वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंकच्या CNN ने नोकऱ्या कमी केल्या आहे, यात इतर अनेक मीडिया दिग्गज कंपन्यांचाही समावेश आहे. Amazon.com Inc., Apple Inc. आणि Meta Platforms Inc. मोठ्या टेक कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता.

HP Inc  कंपनी येत्या 3 वर्षात 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याचे जाहिर केले होते. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनीकडून हा निर्णय घेतल्याचे समजते.  एचपी इंक.चे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटले होते की, अस्थिर मॅक्रो परिस्थितीमुळे आणि मागणी कमी झाल्यामुळे मागील सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.