घरताज्या घडामोडीपंजाबमधील जत्रेत 50 फूट उंचीवरून कोसळला पाळणा, 16 जण जखमी

पंजाबमधील जत्रेत 50 फूट उंचीवरून कोसळला पाळणा, 16 जण जखमी

Subscribe

जत्रेत 50 फूट उंचीवरून पाळणा कोसळून 16 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. पंजाबच्या मोहाली शहरातील फेज आठ येथील दसरा ग्राऊंड येथे जत्रेतील पाळणा खाली कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये 16 जण जखमी झाले आहेत.

जत्रेत 50 फूट उंचीवरून पाळणा कोसळून 16 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. पंजाबच्या मोहाली शहरातील फेज आठ येथील दसरा ग्राऊंड येथे जत्रेतील पाळणा खाली कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये 16 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या अपघातानंतर पाळण्याचा ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (swing fell below 50 feet more than 15 people injured in mohali)

पंजाब येथील मोहाली शहरात रविवारी ही दुर्देवी घटना घडली आहे. मोहालीमधील दसरा ग्राऊंड येथील जत्रेमध्ये हा अपघात घडला. दसरा ग्राऊंड येथे जत्रा भरली होती. दरम्यान, या पाळण्याचा अपघात झाला त्यावेळी पाळण्यामध्ये 30 हून अधिक जण बसले असल्याची माहिती समोर येत आहे. हा पाळणा वर गेला आणि त्यानंतर खाली वेगाने जमिनीनर आदळला. त्यामुळे या अपघातात लोकांना मान आणि पाठीला दुखापत झाली आहे.

- Advertisement -

रविवार असल्याने जत्रेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी हा अपघात घडला. जत्रेतील ड्रॉप टॉवर पाळणा 50 फूट उंचीवरून अतिशय वेगाने खाली कोसळला. यावेळी पाळणा त्यामधील लोकांसह खाली कोसळला. यावेळी सुमारे 30 जण पाळण्यामध्ये बसलेले होते. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले.

जत्रेच्या ठिकाणी आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचाराची व्यवस्था नव्हती. अपघात झाला तेव्हा चेंगराचेंगरी झाली. यामध्येही अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जत्रेत नागरिकांची मोठी गर्दी होती. हा अपघात कसा झाला यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरु असून, त्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.


हेही वाचा – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -