घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट'हे' मलम नाकात लावल्याने कोरोना विषाणू नष्ट होतोय; तज्ज्ञांचा दावा

‘हे’ मलम नाकात लावल्याने कोरोना विषाणू नष्ट होतोय; तज्ज्ञांचा दावा

Subscribe

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध कंपन्या औषध तयार करत आहेत. अनेक देशात लशीच्या चाचण्याही सुरू आहेत. अनेक औषधांवर रिसर्च सुरू आहेत. कोरोनावर परिणामकारक आणि प्रभावी औषधं लवकरात लवकर उपलब्ध व्हावी या दृष्टीने तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील एका कंपनीने एक मलम तयार केल्याचा दावा केला आहे. हे मलम नाकात घातल्यावर ३० सेकंदाच्या आत कोरोनाचा प्रभाव कमी होतो. या ट्रीटमेंटला T3X असं नाव दिलं आहे.

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार नाकात हे मलम लावल्यानं कोरोनासोबतच अनेक प्रकारच्या व्हायरसच्या संक्रमणाला रोखलं जाऊ शकतं. हे मलम नाकाला लावल्यानंतर नाकात एक थर तयार होते. त्यामुळे कोरोना व्हायरसला नाकातून शरीरात जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं. साधारपणे जगभरात कोरोना व्हायरस नाकाद्वारे पसरल्याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत.

- Advertisement -

अशा स्थितीत मलम वापरल्याने नाकाद्वारे होणारा कोरोना संसर्ग रोखला जाऊ शकतो. टेक्सासमधील कंपनी पोनिट्रेशन टेक्नोलॉजीचे प्रमुख डॉ. ब्रायन हबर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मलमचा वापर परिणामकारक ठरेल. हे मलम कोरोनाशी लढण्यासाठी सुरक्षाचक्र ठरेल. हे मलम घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. मेडिकलमध्ये हे मलम उपलब्ध होऊ शकतं.

या मलमाच्या चाचण्या दोन महिन्यांपासून सुरू होत्या. त्यानंतर अमेरिकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन कडून परवानगी मिळाली आहे. चाचणीदरम्यान या मलमाच्या वापरामुळे कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – संतापजनक: मूक बधिर मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून केली हत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -