Video : पंतगाच्या धाग्यात अडकून चिमुकली हवेत उंच उडाली!

पतंगाच्या मांज्यात अडकून चिमुकली हवेत उडाली

तैवानमध्ये सुरू असलेल्या पतंग महोत्सवात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. या अपघातात तीन वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. पंतगाच्या दोऱ्यात ही मुलगी अडकल्यामुळे ही चिमुकली जवळपास १०० फूट उंच उडाली. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या प्रसंगावधनामुळे या मुलीचे प्राण बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तैवान येथील सिंचु शहरात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागातून पतंग उडवणाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. हजारो प्रेक्षकांदेखील हा महोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे. रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी एकजण मोठ्या आकाराचा पतंग उडवत होता. त्याचवेळी त्या पतंगाची दोरीत एक तीन वर्षाची चिमुकली अडकली. जवळपास ६० किमी प्रति तास या वेगाने वारा वाहत होता. त्यामुळे या दोरीत अडकलेली मुलगीदेखील पतंगासह अचानकपणे हवेत उडाली. जवळपास १०० फूट उंच हवेत ती उडाली होती.

हे दृश्य बघताना उपस्थितांच्या अंगवार अक्षरश: काटा आला. या मुलीला वाचवण्यासाठी धावपळ करण्यास सुरुवात केली. लोकांनी प्रसंगावधान राखत या मुलीला वाचवले. या मुलीचे नाव लिन आहे. या घटनेत चिमुकली किरकोळ जखमी झाली. शिंचू शहराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अचानक तीव्र वेगाने आलेल्या हवेमुळे चिमुकली पंतगात अडकली. या घटनेनंतर आता प्रशासनाने आयोजकांना हा पतंग महोत्सव लवकरात लवकर बंद करण्याची सूचना दिली आहे.