नवी दिल्ली : तैवानमध्ये आज पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल एवढी होती. तैवानमधील भूकंपामुळे दक्षिण जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानने म्हटले आहे की, त्सुनामीची पहिली लाट त्याच्या दक्षिणेकडील दोन बेटांवर आली आहे. (Taiwan Earthquake 7.4 magnitude shocks southern Japan Tsunami warning)
हेही वाचा – RCB Vs LSG: लखनऊने मारलं मैदान; मयंक यादवच्या वेगवान माऱ्यापुढे RCBने टेकले गुडघे
माध्यमातील वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरातील हुआलियन काउंटी हॉलपासून 25.0 किलोमीटर दक्षिण-पूर्व दिशेला 15.5 किलोमीटर खोलीवर होता, असे भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे. ईशान्येकडील यिलान काउंटी आणि उत्तरेकडील मियाओली काउंटीमध्ये 5 पेक्षा जास्त तीव्रतेचे हादरे बसले आहेत. तैपेई सिटी, न्यू तैपेई सिटी, ताओयुआन सिटी आणि सिंचू काउंटी, ताइचुंग सिटी, चांगहुआ काउंटी या उत्तरेकडील शहरातील 5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे.
#WATCH | An earthquake with a magnitude of 7.2 hit Taipei, the capital of Taiwan.
Visuals from Beibin Street, Hualien City, Hualien County, eastern Taiwan.
(Source: Focus Taiwan) pic.twitter.com/G8CaqLIgXf
— ANI (@ANI) April 3, 2024
भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपामुळे तैवानमधील हुआलिनमध्ये अनेक घरे आणि इमारती कोसळल्या आहेत. भूकंपामुळे तैपेई, ताइचुंग आणि काओशुंगमधील मेट्रो यंत्रणा 40 ते 60 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तैवानमध्ये 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा – RCB Vs LSG: लखनऊने मारलं मैदान; मयंक यादवच्या वेगवान माऱ्यापुढे RCBने टेकले गुडघे
जपानमध्ये त्सुनामीचा इशारा (japan tsunami warning today)
दरम्यान, तैवानसह शेजारील जपानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे जपान प्रशासनाने दक्षिण जपानमध्ये त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने 3 मीटर (10 फूट) उंचीपर्यंतच्या सुनामी लाटांचा इशारा जारी केला आहे. भूकंपानंतर जपानला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे त्सुनामीचा इशारा जारी केल्यानंतर प्रशासनाने लोकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारी भागांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच दक्षिणकडे अडललेल्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.