तैवान भूकंप: सोमवारी (18 सप्टेंबर) तैवानच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे इमारती हादरल्या आहेत. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने सांगितले की भूकंपाची खोली 171 किमी (106.25 मैल) होती. (Taiwan Earthquake Powerful earthquake in Taiwan Intensity 6.3 )
हवामान खात्याने सांगितले की, भूकंपामुळे इमारती हादरल्या, परंतु नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले आहेत. अनेक जण भीतीने घराबाहेर पडले आहेत.
यापूर्वीही शक्तिशाली भूकंप
सप्टेंबर २०२२ मध्ये तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 एवढी होती. त्यानंतर तैवानच्या दक्षिण-पूर्व भागात झालेल्या भूकंपामुळे 150 जण जखमी झाले होते. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर 21 मार्च रोजी तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 एवढी होती. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती.
नुकताच मोरोक्कोमध्ये विनाशकारी भूकंप झाला
मोरोक्कोमध्ये 8 सप्टेंबर 2023 रोजी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. जो गेल्या 120 वर्षांमध्ये देशातील सर्वात विनाशकारी भूकंप आहे. मोरोक्कोमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे सुमारे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला. याआधी फेब्रुवारीमध्ये तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला होता. या काळात मृतांचा आकडा 23 हजारांच्या पुढे गेला होता. भूकंपानंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रांनी संपूर्ण जग हादरले होते.
(हेही वाचा: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा तापला; कॅनडाने केले भारतावर गंभीर आरोप )