घरट्रेंडिंगकोलकात्यात समलैंगिक विवाह! ताजमहालसमोर केलं प्रपोज, विधिवत लग्नाला घरच्यांचाही पाठिंबा

कोलकात्यात समलैंगिक विवाह! ताजमहालसमोर केलं प्रपोज, विधिवत लग्नाला घरच्यांचाही पाठिंबा

Subscribe

या लग्नामुळे समलैंगिक विवाह (Same sex marriage in kolkata) करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असं या नवजोडप्यांनी म्हटलं आहे.

दोन पुरुषांनी लग्न केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कोलकाताच्या एका भव्य समारंभात या दोन पुरुषांचं (Gay Marriage) लग्न पार पडलं. विधीवत हे लग्न झालं असून हळदी समारंभापासून (Rituals) सात फेऱ्यांपर्यंत सर्व विधी या लग्नात झाले. त्यांच्या या लग्नामुळे समलैंगिक विवाह (Same sex marriage in kolkata) करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असं या नवजोडप्यांनी म्हटलं आहे. (Taj Mahal proposal, Gay couple got married in kolkata)

या दोघांचं लग्न झाल्यावर इतर लव्हस्टोरीप्रमाणेच यांच्याही लव्हस्टोरीसाठी सर्व नेटिझन्स आतूर होते. हे दोघे कुठे भेटले, कोणी कोणाला प्रपोज केलं, लग्नाचा निर्णय कसा घेतला, घरच्यांनी पाठिंबा दिला का? असे अनेक प्रश्न नेटिझन्सने त्यांच्या लग्नाच्या फोटोंच्या कॉमेंटमध्ये विचारले होते. त्यामुळे याविषयावर चैतन्य शर्मा आणि अभिषेक रे यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या भावना प्रकट केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – ती विवाह करतेय पण… काय आहे sologamy trend?

मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, आमची ओळख फेसबूकवर झाली. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. सुरुवातीला आमच्या नात्याला माझ्या घरातून विरोध झाला. मात्र, नंतर आमच्या कुटुंबियांनी हे नातं स्विकारलं. एवढंच नव्हे तर आमच्या मित्र-परिवारानींही या नात्याबाबत विश्वास व्यक्त केला. अभिषेकच्या घरच्यांनीही तत्काळ आमच्या नात्याला परवानगी दिली.

- Advertisement -


२०१८ साली भारतात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानुसार, कलम ३८८ अंतर्गत असलेला समलैंगिक विवाह प्रतिबंध कायदा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक समलैंगिकांनी याप्रती आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा – स्वत:शीच विवाह!

म्हणूनच, चैतन्यने भारतातील समलैंगिक जोडप्यांना एक संदेश दिला आहे. तो म्हणतो की, LGBTQ ला देशभरात अधिकृत मान्यता मिळण्याकरता आम्ही महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आमच्या या निर्णयामुळे भारतातील अनेक समलैंगिक जोडप्यांना पुढे येण्यास आणि लग्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. LGBTQ समजाला मी एवढाच संदेश देईन की त्यांनी हिंमतवान बनावं आणि तुम्हाला ज्या पद्धतीने जगायची इच्छा तसंच जगावं. तसेच, आपल्या अधिकारांसाठी सतत लढत राहावं.

ताजमहलसमोर प्रपोज

आपल्या जोडीदाराने संपूर्ण जगासमोर आपल्याला प्रपोज करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. समलैंगिक संबंधात असणाऱ्या जोडप्यांच्याही अशाच रोमॅटिंग भावना असतात. म्हणूनच चैतन्यने अभिषेकला ताजमहाल समोर गुडघ्यावर बसून संपूर्ण जगासमोर प्रपोज केलं. मार्च २०२० रोजी चैतन्यने अभिषेकला प्रपोज केलं. आणि कोलकाता येथे अत्यंत थाटामाटात, घरच्यांच्या सहमतीने विधीवत लग्नही केलं. तो म्हणाला की आम्हाला आमच्या लग्नासाठी भारत सोडून जायचं नव्हतं. समलैंगिक संबंधाला मान्यता असलेल्या देशात जाऊन लग्न करण्यात रस नव्हता. किंबहुना भारतातच लग्न करून भारतातील समलैगिंक जोडप्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं, म्हणूनच आम्ही भारतात राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पुढच्या महिन्यापासून हे दोघेही नियमित आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.


भटजींनी दिला पाठिंबा

या दोघांनी विधिवत लग्न करण्याचा निर्णय तर घेतला पण विधींसाठी भटजी उपलब्ध होईना. अनेक भटजींना विनंती करूनही त्यांनी होकार दिला नाही. अखेर, अभिषेकच्या ओळखीच्या भटजींनी लग्नात विधी करण्यास परवानगी दिली. ते म्हणाले की, आम्ही लक्ष्मी नारायणाचा जोडा पाहिला आहे, हा नारायण-नारायणचा जोडा आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -