घरताज्या घडामोडीताज महलच्या त्या २२ बंद दरवाजांमागचे रहस्य उलगडणार, उच्च न्यायालयात याचिका

ताज महलच्या त्या २२ बंद दरवाजांमागचे रहस्य उलगडणार, उच्च न्यायालयात याचिका

Subscribe

काही हिंदू संघटना आणि संत तसेच इतिहासकारांनी ताजमहल हे पूर्वी शिव मंदिर असल्याचा दावा केला आहे.

ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांची मूर्ती आणि धर्मग्रंथ आहेत. तरी त्याची खातरजमा करण्यासाठी या कुलूपबंद खोल्या उघडण्यात याव्यात अशी याचिका भाजपच्या एका नेत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात केली आहे. यावर न्यायालय काय सुनावणी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ताजमहलशी संबंधित हा वाद जुनाच आहे. भाजप नेते विनय कटीयार यांनी त्याच आधारावर ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत सांगण्यात आले आहे की काही हिंदू संघटना आणि संत तसेच इतिहासकारांनी ताजमहल हे पूर्वी शिव मंदिर असल्याचा दावा केला आहे. तसेच काही जणांच्या मते तेजो महल उर्फ ताज महल हे एक ज्योतिर्लिंग आहे जे शिव मंदिराचे प्रतीक आहे. तसेच ताज महलच्या चार मजली इमारतीच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर जे २२ खोल्या आहेत त्या अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहेत. या खोल्यांमध्ये कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान शंकराचे मंदिर आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती आणि धर्मग्रंथ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

ताजमहाल हे तेजोमहल असल्याचा दावा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु संघटना करत आहेत. श्रावण महिन्यात ताजमहलमध्ये शिव आरती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तर काही दिवसांपूर्वी परमहंसाचार्यांनी ताजमहल हे तेजोमहाल असल्याचा दावा करत तेथे शिवपूजा करण्यावर ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना किठम येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नजरबंद करण्यात आले होते. नंतर त्यांना अयोध्येत पाठवण्यात आले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -