घरदेश-विदेशराष्ट्रीय सुरक्षेची माहिती उघड करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई करा - काँग्रेस

राष्ट्रीय सुरक्षेची माहिती उघड करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई करा – काँग्रेस

Subscribe

वादग्रस्त शेतकरी कायदे मागे घेण्याची काँग्रेसची मागणी

दिल्लीत आज काँग्रेस कार्यसमितीची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ३ प्रस्ताव पारित करण्यात आले. यामध्ये पहिला प्रस्ताव देशातील ६२ लाख आंदोलक शेतकरी, गरीब शेतकरी जे रस्त्यावर उतरले आहेत यावर आधारित आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार देशद्रोही घोषित करत आहे. या वक्तव्याचा निषेध करत केंद्र सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर दुसरा प्रस्ताव हा कोरोना लसीकरणाबाबत आहे. या प्रस्तावात काँग्रेस कार्यसमितीने देशातील १३५ करोड लोकांना आणि मागासवर्गीय, दुर्बल घटक तसेच ट्रायबल भागातील लोकांना वेळेचे नियोजन करुन मोफत लसीकरण करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. तर तिसऱ्या प्रस्तावात देशातील सुरक्षा व्यवस्थेतील दोषींवर राजद्रोहाची कारवाई करण्याची तसेच सत्तेत असून राजद्रोहाचे दोषी असतील त्यांच्यावर विशेष समिती स्थापन करुन कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक मार्च ते जून पर्यंत चालणार असून ती जूनच्या अखेरीस पार पडेल. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. तसेच या बैठकीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी याच्यावरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत कृषी कायद्यांवर पहिला प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या ३ नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरुन मागील ३ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकार शेतकरी आंदोलकांना देशद्रोही घोषित करत आहे. याचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. तसेच तीन कृषी कायद्यांना लकरात-लवकर रद्द करावे किंवा मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या बैठकीत दुसरा प्रस्ताव हा कोरोना लसीकरणाबाबत मांडण्यात आला होता. या प्रस्तावात देशात सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण ते सर्वसामान्यांसाठीचे लसीकरण यावर चर्चा करण्यात आली आहे. काँग्रेस बैठकीत सामान्य नागरिकांना तसेत दलित गटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली. देशात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील तसेच समाजातील मागास, दुर्बल, दलित आणि ट्राईबल घटकांनाही मोफत कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आलेला तिसरा प्रस्ताव हा देशातील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर होता. अर्णब गोस्वामीच्या चॅटप्रकरणाबाबत भाष्य करत देशातील राष्ट्रीय सुरक्षेबाबत माहिती चव्हाट्यावर आणणाऱ्यांची आणि सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्यांची संसदीय समितीमार्फत चौकशी करुन राजद्रोहाची कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. जे लोक इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र वाटतात त्यांचा आता पर्दाफाश झाला आहे’ असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -