घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटलॉकडाऊनच्या काळात व्हिटॅमिन डी घ्या; ब्रीटनच्या नागरिकांना सूचना

लॉकडाऊनच्या काळात व्हिटॅमिन डी घ्या; ब्रीटनच्या नागरिकांना सूचना

Subscribe

ब्रीटनमधील लोकांना व्हिटॅमिन डी घेण्याची सूचना देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ब्रीटनमधील लोकांना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये (ऑक्टोबर ते मार्च) दररोज १० मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

इंग्लंडच्या आरोग्य खात्याने लॉकडाऊन दरम्यान लोकांना व्हिटॅमिन डी खाण्याची सूचना दिली आहे. या सूचनेत असं म्हटलं आहे की, उन्हाळा संपेपर्यंत लोकांनी व्हिटॅमिन डी पदार्थांचे सेवन करावं. सहसा, उन्हात राहून किंवा बाहेर चालून मानवी शरीरात व्हिटॅमिन डीची पुर्तता होते. सूर्यप्रकाशापासून मिळणारा व्हिटॅमिन डी आपलं शरीर निरोगी आणि संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतं. कोणत्याही साथीच्या रोगात सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो. ब्रीटनमधील लोकांना व्हिटॅमिन डी घेण्याची सूचना देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ब्रीटनमधील लोकांना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये (ऑक्टोबर ते मार्च) दररोज १० मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. इंग्लंडच्या आरोग्य खात्याने व्हिटॅमिन डीच्या वापरावर जोर दिला आहे कारण कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लोक घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत शरीरात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे त्यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. स्कॉटलंड आणि वेल्स सरकारनेही अशाच सूचना दिल्या आहेत.

या सूचनेवर ब्रिटीश न्यूट्रिशन फाउंडेशनच्या सारा स्टॅनर म्हणाल्या, “कोरोनो विषाणूचा प्रभाव कायम आहे, त्यामुळे आपल्यातील बरेच लोक घरातच कैद आहेत. शासकीय नियमांचे नीट पालन करून घरी राहणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत मर्यादित पोहोचत आहे, म्हणून निरोगी राहण्यासाठी, आपल्याला व्हिटॅमिन डीची पातळी देखील राखली पाहिजे.”

- Advertisement -

हेही वाचा – वटवाघळात शेकडो कोरोना विषाणू; भविष्यात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा प्रसार

व्हिटॅमिन डीचा काय फायदा?

मानवी शरीरात हाडे, दात आणि स्नायू निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचा आहे. या अभावामुळे मुलांमध्ये रिकेट्स नावाचा हाडांचा आजार होऊ शकतो. तर या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये ऑस्टियोमॅलेशिया होण्याची शक्यता असते ज्यामुळे हाडं कमजोर होतात. काही अभ्यासांमध्ये व्हिटॅमिन डी संक्रमणापासून संरक्षण करतो असं दिसून आलं आहे, परंतु अद्याप असे कोणतेही पुरावे नाहीत की व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.

व्हिटॅमिन डी चं सेवन करावं का?

व्हिटॅमिन डीचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे परंतु व्हिटॅमिन डीचे दीर्घकालीन सेवन धोकादायक सिद्ध होऊ शकतं. १-१० वर्षांच्या मुलांसाठी दररोज ५० मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी दररोज २५ मायक्रोग्राम आणि प्रौढांना १०० मायक्रोग्राम व्हिटॅमिन डी चं सेवन करु शकतात. मात्र, ज्यांना किडनीचा त्रास आहे आणि तीव्र आजार आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्हिटॅमिन डी घ्यावा.

- Advertisement -

कोरोना संसर्गामध्ये व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे?

कोरोना संसर्गामध्ये व्हिटॅमिन डी फायदेशीर नाही. अद्याप कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत की व्हिटॅमिन डीचे सेवन केल्यामुळे कोरोना संसर्गाची जोखीम कमी होते, परंतु काही तज्ज्ञांच्या मते हे साथीच्या रोगांमध्ये फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डी घेतल्यास आरोग्य चांगले राहते. व्हिटॅमिन डी कोरोनो विषाणू रुग्णांना मदत करते की नाही यावर स्पॅनिश आणि फ्रेंच संशोधक संशोधन करत आहेत.

,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -