घरताज्या घडामोडीTaliban VS Haqqani Network: तालिबान सरकारमध्ये पडली फूट! तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये...

Taliban VS Haqqani Network: तालिबान सरकारमध्ये पडली फूट! तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये सुरू झाला संघर्ष

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा करून आज एक महिना पूर्ण झाला आहे. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने नवीन सरकार स्थापनेची घोषणा ७ सप्टेंबरला केली होती. तालिबान सरकारला स्थापनेला आठवडा पूर्ण होताच या सरकारमध्ये फूट पडल्याचे समोर येत आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये श्रेयासाठी संघर्ष सुरू झाला आहे. ज्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादर काबूल सोडून गेले आहेत.

मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना तालिबान सरकारमध्ये उपपंतप्रधान बनवले आहे. काही दिवसांपूर्वी हक्कानी नेटवर्क आणि तालिबान भिडले होते. ज्यामध्ये बरादर यांना गोळी लागल्याचे समोर आले होते. आता पुन्हा बरादर आणि हक्कानी नेटवर्कचे नेता खलील उर-रहमानमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही गटांचे समर्थक आपापसात भिडले. हक्कानी नेटवर्कचे म्हणणे आहे की, त्यांच्या आक्रमकपणामुळे अफगाणिस्तानमधील सत्ता मिळाली आहे. तर बरादरचे म्हणणे आहे की, त्यांच्या रणनीतिमुळे तालिबान जिंकले आहे. अशा प्रकारे तालिबान विजयाचे श्रेय घेण्यासाठी बरादर आणि हक्कानी नेटवर्क ऐकमेकांना भिडले.

- Advertisement -

तसेच सरकारमधील हिश्श्यावरून तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात वाद आहे. हक्कानी नेटवर्कला अफगाणिस्तान सरकारमध्ये प्रमुख भूमिका हवी आहे, परंतु तालिबानच्या नेत्यांना हे नको आहे. याबाबतही दोघांमध्ये वाद आहे. माहितीनुसार पंजशीरमध्ये कब्जा केल्यानंतर दोन्ही गटांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये बरदार जखमी झाले होते. दरम्यान बीबीसीच्या वृत्तानुसार, आता बरादर काबूल सोडून कान्दाहार गेले आहेत. जिथे ते कान्दारच्या सर्वोच्च नेत्याला भेटले आहेत.


हेही वाचा – Afghanistan: तालिबानच्या राजवटीत १५० हून अधिक अफगाण माध्यमं केली बंद

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -