घरताज्या घडामोडीTaliban अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा, जगाने का घेतलाय धसका?

Taliban अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा, जगाने का घेतलाय धसका?

Subscribe

अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याने अफगाणि नागरिकच नाही तर संपू्र्ण जग धास्तावले आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबान्यांनी कब्जा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याने अफगाणि नागरिकच नाही तर संपू्र्ण जग धास्तावले आहे.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून अफगाणि सुरक्षा दल आणि तालिबान्यांनमध्ये संर्घष सुरू आहे. अमेरिकेने नाटो सैनिकांना माघारी बोलवताच तालिबान्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत एका पाठोपाठ कंदहार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्क या शहरांसह अफगाणिस्तानच्या इतर भागांवर कब्जा मिळवण्याचा सपाटाच लावला. पण काबुलपर्यंत पोहचणे त्यांना कठीण होते. यामुळे काबुल सर्वात सुरक्षित शहर असल्याचे बोलले जात होते. मात्र रविवारी पहाटे तालिबान्यांनी काबुल शहराला चारही बाजूने घेरले. नंतर तालिबान्यांनी अफगाण सरकारला शांततेत हस्तांतरण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर तालिबान्यांसमोर सपशेल शरणागती पत्करत अफगाण सरकार व सैनिकांनी गुडघे टेकले. तर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याने अफगाणि नागरिकांच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या आणि संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेला. या घटनेने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. कारण तालिबानचा विजय म्हणजे दहशतवाद आणि अराजकतेचा विजय आहे. ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय ते अफगाणि नागरिक बायका पोरांसह ताजिकिस्तान, इराण आणि आजूबाजूच्या देशांमध्ये पलायन करत आहेत. तालिबान्यांनी अफगाणि सरकारी कर्मचाऱ्यांना अभय देण्याबरोबरच सोबत काम करण्याचा पर्याय दिला आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी टि्वट करत स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

कारण तालिबानी कायम अफगाणि जनतेसाठी काम करत असल्याचे जाहीर करत असले तरी त्यांचे खरे रुप हिंस्त्र जनावरापेक्षाही भयंकर आहे. त्यातही वाटेल तेव्हा घरात घुसून महिला व मुलींवर बालकांवर लैंगिक अत्याचार करणे. त्यांना सेक्सगुलाम बनवणे. वाटेल तेव्हा त्यांना घरातून उचलून नेलं. वयात आलेल्या , न आलेल्या आणि अगदी दोन चार मुलांची माता असलेल्या महिलांचा वापर सेक्सगुलाम म्हणून तालिबान्यांनी केला आहे आणि करत आहेत. तर अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुंडके उडवत कत्तल करणे, दगडाने ठेचून हत्या करणे या अघोरी शिक्षांचा तालिबान्यांना शौक आहे. जगभरातील दहशतवादी संघटनांना पोसणारेही तालिबानीच आहेत. यामुळे तालिबान हा फक्त अफगाणपुरता मर्यादित न राहता जगभरात आपली दहशत निर्माण करणार हे निश्चित आहे. यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे शांत असलेल्या दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय होणार आहेत. त्यातही पाकिस्तान या संघटनांचा पोशिंदा असल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान तालिबानला उकसवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आयएसआय, ईसीस पुन्हा जगभरात दहशतवाद माजवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

 

अफगाणिस्तानावरील तालिबान्यांच्या कब्जामुळे येथील महिलांच स्वातंत्र्य संपल असून गुलामगिरीच्या जोखडात त्यांना जगाव लागणार आहे. यामुळे संपू्र्ण जग धास्तावलं असून तालिबान्यांच्या तावडीतून आता अल्लाच या महिलांच संरक्षण करो अशी दुवा जगभरातील महिला करत आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -