घरताज्या घडामोडीAfghanistan: तालिबानची क्रूरता सुरुच! फोटोग्राफर मुर्तजा समधीला चढवणार फासावर

Afghanistan: तालिबानची क्रूरता सुरुच! फोटोग्राफर मुर्तजा समधीला चढवणार फासावर

Subscribe

अफगाणिस्तानात (Afghanistan) कब्जा केल्यापासून तालिबानचा (Taliban) क्रूर चेहरा समोर येऊ लागला आहे. यामुळे अफगाण नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. दरम्यान तालिबानने सरकारमध्ये महिला हिस्सा देण्याचे आश्वासन केले होते. तसेच पूर्वीप्रमाणे तालिबानचे हे नवीन सरकार नसेल असे म्हटले होते. मात्र तसे काही चित्र दिसत नाही आहे. तालिबानच्या विरोधात महिलांसह अफगाण नागरिक आंदोलन करत आहेत. हेच आंदोलन कव्हर करणारा फोटोग्राफर मुर्तजा समधीला (Morteza Samadi) तालिबानने कोठडीत ठेवले असून आता त्याला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुर्तजावर अफगाण नागरिकांना तालिबानच्या विरोधात भडवण्याचा आणि हेरगिरीचा आरोप तालिबानकडून ठेवण्यात आला आहे.

माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये पश्चिमेला असणाऱ्या हेरात प्रातांमध्ये आंदोलनात फोटोग्राफर मुर्तजाने सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याला ७ सप्टेंबरला तालिबाने आपल्या ताब्यात घेतले. मुर्तजा समधीने तालिबान विरोधात पुढाकार घेतला होता. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून तालिबानच्या कोठडीत त्याच्यावर छळ करण्यात येत आहे. आता समधीला फासावर चढवण्याचा निर्णय तालिबानने घेतला आहे. मुर्तजा समधीला फाशी झाली तर संपूर्ण जगात तालिबानविरोधी असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सीपीजेच्या वृत्तानुसार, समधीने तालिबानने अटक करण्याच्यापूर्वी तालिबान विरोधी आंदोलनच्या समर्थनार्थ फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. समधीने जवळपास दोन वर्ष फ्रीलान्स फोटो जर्नालिस्ट म्हणून काम केले आहे. यापूर्वी समधी चेकाद टीव्ही आणि रेडिओ टेलिव्हिजनवर अफगाणिस्तानसोबत रिपोर्टर म्हणून काम केले होते.

यापूर्वी तालिबानने महिला आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकारांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी या पत्रकारांना अटक करून बांबू आणि रायफलने मारहाण केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan: दाढी कापण्यावर तालिबानने घातली बंदी; सलूनच्या बाहेर लावली नोटीस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -