घरताज्या घडामोडीTaliban: अफगाणिस्तानमध्ये आता महिला विद्यापीठात घेऊ शकतात शिक्षण, पण तालिबान्यांनी घातली ही...

Taliban: अफगाणिस्तानमध्ये आता महिला विद्यापीठात घेऊ शकतात शिक्षण, पण तालिबान्यांनी घातली ही अट

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा दुहेरी चेहरा समोर येत आहे. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये सरकारमध्ये हिस्सा मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना तालिबान्यांनी मारहाण केली. पण दुसऱ्याबाजूला तालिबान महिला शिक्षणास परवानगी देत आहे. अफगाणिस्तानमध्ये नवीन तालिबान सरकारचे उच्च शिक्षा मंत्री म्हणाले की, महिला पदव्युत्तर (पीजी) अभ्याक्रमासाठी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. परंतु लिंगानुसार त्यांच्यामध्ये विभाजन केले पाहिजे आणि इस्लामिक ड्रेस घालणे अनिवार्य असेल. रविवारी मंत्री अब्दुल बकी हक्कानीने नवीन धोरणांची रुपरेषा सादर केली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या नव्या शासनाने पूर्ण तालिबान सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. ज्यात एकही महिला सदस्य नाही आहे.

१९९०च्या उत्तरार्धात पहिल्यांदा सत्तेवर आलेले तालिबानी आता किती वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात हे संपूर्ण जग पाहत आहे. त्यावेळेस मुलींना आणि महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते आणि सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले होते. पण आता तालिबान बदलले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये महिलांबद्दलचा दृष्टीकोन देखील बदलल्याचा समावेश आहे. पण अलीकडेच समान अधिकारांची मागणी करणाऱ्या महिला आंदोलकांवर तालिबान्यांनी केलेला हिंसाचार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

हक्कानी म्हणाले की, तालिबान २० वर्ष मागे जाऊ इच्छित नाही आहे. आम्हाला आज जे आहे, त्या जोरावर आम्ही पुढे जायला सुरुवात करू. सध्या महिलांना विद्यापीठात शिकताना तालिबानकडून लावलेल्या काही प्रतिबंधांचा सामना करावा लागेल. ज्यामध्ये बुरखा घालणे अनिवार्य असेल. परंतु याचा अर्थ डोक्याचा स्कार्फ घालणे किंवा चेहरा झाकणे अनिवार्य आहे का याचा खुलासा केला नाही आहे. तसेच मुलं-मुलींना एकत्र अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे. विद्यापीठात कोणते विषय शिकवले जातील याचा आढावा घेतला जाईल.


हेही वाचा – भारतात आता तालिबानी विचार: एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -