घरदेश-विदेश"तालिबान्यांनी महिलांना राजकारणात संधी देत सकारात्मक दृष्टीकोन आणला", शाहिद आफ्रिदीचे तालिबान्यांसाठी उफाळून...

“तालिबान्यांनी महिलांना राजकारणात संधी देत सकारात्मक दृष्टीकोन आणला”, शाहिद आफ्रिदीचे तालिबान्यांसाठी उफाळून आले प्रेम

Subscribe

Shahid Afridi bats for the Taliban in Afghanistan : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेताच पुन्हा तालिबानी दहशतवाद्यांनी हैदोस घातला आहे. अफगाणमधील एक-एक शहर या दहशवाद्यांनी ताब्यात घेतले. यामुळे तालिबान्यांच्या हुकूमशाही, जूलुमी राजवटीत जगण्यापेक्षा नागरिकांनी देश सोडण्यासाठी धडपड सुरु केली आहे. तर तालिबान्यांना विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बेछूट गोळीबार करत मारले जातेय. तालिबान्यांचा रक्तरंजित संघर्ष सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु आहे. अफगाणास्तमधील सध्याच्या भीषण परिस्थितीवर अफगाणी गोलंदाज राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी सोशल मीडियावर जाहीर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी तालिबान्यांच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. शाहिद आफ्रिदीने तालिबान्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन दिसल्याचे म्हणत त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

शाहिद आफ्रिदी नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अशातच क्रुर तालिबान्यांच्या बाजूने उभे राहत त्यांने नव्या वादाला तोंड फोडले आहे. अफगाणिस्तानवर शस्त्राच्या साहाय्याने ताबा मिळणाऱ्या तालिबान्यांमध्ये शाहिद आफ्रिदीला सकारात्मकता दिसलीय. तालिबान्यांचे कौतुक करण्याच्या नादात तो बरंच काही वादग्रस्त बोलून गेला. त्यामुळे क्रिकेट विश्वासह अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आले आहेत. त्यांनी येथील महिलांना काम करण्याची व राजकारणात सहभागी घेण्याची परवानही दिली आहे. या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. तालिबानी क्रिकेटलाही पाठींबा देत आहेत. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे मालिका होऊ शकली नाही, परंतु तालिबान्यांचा क्रिकेटला पूर्णपणे पाठींबा आहे.”

शाहिद आफ्रिदेचे वक्तव्य आणि आत्ताची तालिबानमधील परिस्थिती यात बराच विरोधाभास आहे. कारण तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेताच येथील महिला, मुलींना घरातून बाहेर खेचत त्यांच्यावर अत्याचार केल्याची बातम्या व्हायरल होऊ लागल्या, तर त्यांना विरोध करणाऱ्या अफगाणी नागरिकांना गोळ्या झाडत ठार केले, याशिवाय माध्यमांवरही बंधने आणली, त्यामुळे शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे.

- Advertisement -

महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक छळाची बातमी झाली लीक; अलीबाबा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -