घरताज्या घडामोडीPanjshir Valley: पंजशीरवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा अहमद मसूदने फेटाळला! जारी केला...

Panjshir Valley: पंजशीरवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा अहमद मसूदने फेटाळला! जारी केला ऑडिओ संदेश

Subscribe

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) पंजशीर खोऱ्यावर (Panjshir Valley) नियंत्रण मिळवण्याची अधिकृत घोषणा तालिबानने (Taliban) केली होती. पण रजिस्टेंस फोर्सेजचा नेता अहमद मसूदने आपल्या फेसबुक पेजवर एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रजिस्टेंस फ्रंट अजूनही पंजशीरमध्ये असून तालिबानसोबतची लढाई अजूनही सुरू आहे. टोलोन्यूजच्या माहितीनुसार हे विधान जारी करण्यात आले आहे. दरम्यान पंजशीर सैन्याने आणि नॉर्दर्न अलायन्सच्या सैन्याने अहमद मसूदच्या नेतृत्वात अफगाणिस्तानमध्ये बंडखोरी जाहीर केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.

दरम्यान पूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंजशीर खोऱ्यातील गेटवर ताबिलानी उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे तालिबान्यांचा झेंडा दिसत आहे. एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, पंजशीरमधील संघर्षात विरोधी गटाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर अहमद शाह मसूदच्या वतीने तालिबानला चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तालिबानने आता त्याची ऑफर नाकारली आहे.

- Advertisement -

पंजशीर खोऱ्यात हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने तालिबान्यांना सहयोग केला आहे. रविवारी तालिबान्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने रजिस्टेंस फ्रंटच्या ठिकाणांवर ड्रोनच्या मदतीने हवाई हल्ला केला. यामध्ये पंजशीरचे अनेक कमांडर मृत्यूमुखी पडले. पंजशीरमधील रजिस्टेंसचे प्रमुख नेता आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह ज्या घरात राहत होते, त्यावरही हल्ला केला आहे. त्यामुळे हल्ल्यानंतर अमरुल्ला सालेह तालिकिस्तानमध्ये पळून गेल्याचे म्हटले जात आहे. तसेच अहमद मसूद पंजशीरमध्ये सुरक्षित ठिकाणी आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत पंजशीरमध्ये लढत राहू असे मसूद म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan: तालिबान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला सहा देशांना आमंत्रण; भारताला डावललं


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -