Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Taliban Takeover Afganistan : पंजशीर प्रांतात ताबा मिळवला, तालिबान्यांचा दावा

Taliban Takeover Afganistan : पंजशीर प्रांतात ताबा मिळवला, तालिबान्यांचा दावा

Related Story

- Advertisement -

तालिबानने अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांताचा संपुर्ण ताबा घेतल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानातील या शेवटच्या प्रांतातून रेजिस्टन्स फ्रंटचा लढा सुरू होता. पण पंजशीरमध्ये सुरू असलेल्या गोळीबारात रेझिस्टन्स फ्रंटचा प्रवक्ता ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक टेरोरिस्ट ग्रुपचे प्रवक्ते झबीउल्लाह मुझेद यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोशल मिडियावर जाहीर झालेल्या माहितीनुसार तालिबानी आता पंजशीर प्रांतातील गव्हर्नर कंपाऊंड येथे उभे असतानाचे दिसत आहेत. तालिबानचे प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिदने एका पत्रकातून स्पष्ट केले आहे की, पंजशीर प्रांताचा ताबा मिळवल्याने संपुर्ण देशाचा ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Taliban claims complete takeover on panjshir valley)

- Advertisement -

पंजशीर प्रांतात शुक्रवारपासूनच संघर्ष हा तीव्र झाला. या संघर्षामध्ये नॅशनल रेजिस्टन्स फ्रंटचे दोन वरिष्ठ नेते ठार केल्याचा दावा तालिबान्यांनी केला होता. तालिबानी आणि नॅशनल रेजिस्टन्स फ्रंटमध्ये झालेल्या चकमकीत नॅशनल रेजिस्टन्स फ्रंटचा मुख्य प्रवक्ता फहीम दश्ती आणि जनरल अब्दुल वुदोद झारा यांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांच्या घरावरही हेलिकॉप्टर अटॅक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सालेह हेदेखील सुरक्षित ठिकाणी गेल्याची माहिती समोर आली आहे.

नॅशनल रेजिस्टन्स ऑफ अफगाणिस्तानचे दोन नेते तालिबान्यांशी संघर्ष करताना आपण गमावले आहे. फहीम दश्तीस एनआरएफचे प्रवक्ते आणि जनरल अब्दुल वुदुद झारा हे शहीद झाल्याचे अफगाण रेजिस्टन्स फ्रंटने स्पष्ट केले आहे. तालिबानचे सदस्य हे पंजशीर प्रांतात गव्हर्नर कंपाऊंड येथे दिसले. अनेक सोशल मिडियातील फोटोंमधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

एनआरएफने फेटाळला दावा 

- Advertisement -

तालिबान विरोधात संघर्ष करणाऱ्या नॅशनल रेजिस्टन्स फ्रंट (NRF)ने मात्र हा दावा फेटाळला आहे. एनआरएफचे प्रवक्ता अली मैसमने बीबीसी या वाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये तालिबान्यांनी संपुर्ण पंजशीर प्रांतावर ताबा केल्याचे वृत्त फेटाळले आहे. हा दावा खोटा असून मी दावा फेटाळत असल्याचेही अली मैसमने स्पष्ट केले आहे.

 


हे ही वाचा – जावेद अख्तर यांनी तालिबान्यांसोबत केली RSSची तुलना, म्हणाले…


 

- Advertisement -