घरताज्या घडामोडीTaliban: तालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

Taliban: तालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

Subscribe

तालिबान राजवटीत ९ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला होता. याच दहशतवादी हल्ल्याचा तालिबानने पहिल्यांदाच निषेध केला आहे. एबीपी न्यूजसोबत बातचित करताना तालिबानच्या प्रवक्त्याने अल कायद्यापासून स्वतःला दूर केले. हाच अल-कायदा बिन लादेन तालिबानच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानमध्ये लादला होता, आता याच कायद्यासोबत असलेले संबंध लपवण्याचा प्रयत्न तालिबान करत आहे.

तालिबानने पहिल्यांदा २० वर्षांनंतर अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निष्पापांचे रक्त वाहने चुकीचे होते. एबीपी न्यूज एजेंसीसोबत बोलताना तालिबानचे प्रवक्ता तारिक गजनीवाल म्हणाले की, त्यांचा अल-कायदासोबत काहीही संबंध नाही आहे. जिहादच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे चुकीचे होते.

- Advertisement -

तालिबानच्या बदलेल्या या रुपासंबंधित आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तालिबान खरंच बदलला आहे? की बदलण्याची अॅक्टिंग करत आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या जी परिस्थितीत आहे, त्याचे आणखीन एक कारण असल्याचे दिसत आहे. कारण तालिबानला आता विरोधकांच्या बुंदूकांना आव्हानापेक्षा गरीबांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. पहिल्यापासून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था परदेशी मदतीच्या आधारावर आहे. जीडीपीचा ४० टक्के भाग परदेशी मदतीने मिळतो. पण अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून परदेशी मदत थांबली आहे. जागतिक बँक आणि आयएमएफने देखील अफगाणिस्तानला मदत थांबवली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान बँकेचे ९ अब्ज डॉलरचे परकीय चलन गोठवले आहेत. बँक बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना रोखीची चिंता आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये खाण्यापिण्याच्या, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडू लागले आहेत.


हेही वाचा – तालिबानमुळे जगावर ९/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती, युकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा इशारा 


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -