Explosion in Afghanistan: पूर्व अफगाणिस्तानमध्ये मोठा स्फोट; ९ मुलांचा मृत्यू, तर ४ जण जखमी

ऑगस्ट २०२१मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या भागात हिंसा आणि हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Taliban Explosion kills 9 children in eastern Afghanistan
Explosion in Afghanistan: पूर्व अफगाणिस्तानमध्ये मोठा स्फोट; ९ मुलांचा मृत्यू, तर ४ जण जखमी

तालिबानने कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानमध्ये अशांतता पसरली आहे. पूर्व अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या सीमेजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात ९ मुलांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. राज्यपालांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा पूर्व नगरहार प्रांतातील लालोपर जिल्ह्यात अन्नपदार्थ विकणाऱ्या वाहनाने जुन्या न स्फोट झालेल्या मोर्टार शेलला धडक दिली तेव्हा हा स्फोट झाला.

हा प्रांता तालिबानचा प्रतिस्पर्धी आणि इस्लामिक स्टेट गटाचे मुख्यालय आहे. ज्यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यात तालिबानने देशावर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या नव्या प्रशासनावर निशाणा साधत अनेक हल्ले केले होते. २०१४ पासून अफगाणिस्तानमध्ये अनेक भयानक हल्ले केले गेले आहेत. तसेच अनेकदा देशातील अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांना लक्ष्य केले आहे.

अफगाणिस्तान अनेक दशकांपासून सर्वाधिक भुसुरुंग आणि इतर शस्रे असलेला देश आहे. जेव्हा कधी येथे शस्रांचा स्फोट होतो, तेव्हा बहुतेकदा लहान मुलांचाच मृत्यू होतो. काही महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या अल्पसंख्यांक शियाबहुल क्षेत्रात मिनी बसमध्ये झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू आणि ७ लोकं जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट असल्याचा संशय होता.

दरम्यान ऑगस्ट २०२१मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या भागात हिंसा आणि हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तालिबानने महिला आणि निषेध करणाऱ्या लोकांवर हल्ले केले. शिवाय तालिबानने अनेक फतवे काढून निर्बंध लावले.


हेही वाचा – न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी