घरताज्या घडामोडीपत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूनंतर तालिबानने व्यक्त केला खेद

पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूनंतर तालिबानने व्यक्त केला खेद

Subscribe

माध्यम क्षेत्रातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर तालिबानने यावर स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला.

अफगाणिस्थानच्या गोळाबारात झालेल्या चकमकीत पत्रकार दानिश सिद्दीकी यांना गोळी कशी लागली हे आम्हाला माहिती नाही. दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui)  यांच्या मृत्यूचा आम्हाला खेद वाटतो, असे तालिबान प्रवक्त जबीउल्लाह मुजाहिद यांनी सीएनएन न्यूज १८शी बोलताना म्हटले आहे. ( Taliban expressed regret over the death of journalist Danish Siddiqui)  भारतीय फोटो जर्नलिस्ट,पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधील कंदाहार येथे वृत्तांकन गेले असता चकमकीत हत्या झाली. दानिश सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदी काम करत होते. त्यांच्या हत्येच्या वृत्तानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या वृत्तानंतर माध्यम क्षेत्रातून मोठा निषेध व्यक्त करण्यात आला. दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससोबत होते त्यांच्यासोबत ते तालिबानविरुद्ध कारवायांचे वृत्तांकन करत होते. माध्यम क्षेत्रातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर तालिबानने यावर स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला.

दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूचा खेद व्यक्त करत तालिबानने पुढे असे म्हटले आहे की, तालिबानमध्ये युद्ध क्षेत्रात कव्हरेजसाठी येणाऱ्या पत्रकारांनी आम्हाला सूचना देणे महत्त्वाचे आहे. पत्रकार युद्ध क्षेत्रात कव्हरेजसाठी येताना आम्हाला कोणतीही सूचना न देता नाहीत. जर पत्रकार कव्हरेज करण्यासाठी येणार असल्याचे आधीपासून माहिती असल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे सहज शक्य होईल,असे तालिबानने म्हटले आहे.

- Advertisement -

कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकी यांच्या हत्येच्या वृत्ताने दु:ख झाले, दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश सिद्दीकी अफगाण सुरक्षा दलासोबत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केले अशी माहिती देत अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडडजे यांनी ट्विट करुन दानिश सिद्दीकी यांच्या हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दानिश यांचा मृतदेह रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय समितीकडे सोपवण्यात असून मृतदेह भारतात आणण्याची तयारी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकं मरत आहे, जो बायडन यांची संतप्त प्रतिक्रिया

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -