घरदेश-विदेशअफगाणी सैनिकाचा शिरच्छेद करत तालिबान्यांनी केला जल्लोष

अफगाणी सैनिकाचा शिरच्छेद करत तालिबान्यांनी केला जल्लोष

Subscribe

तालिबानने अफगाणिस्तान हस्तगत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांना सुरक्षा आणि शांततेशी संबंधित काही आश्वासने दिली. परंतु सत्तेत आल्यापासून तालिबानच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत. यामुळे तालिबान जवळजवळ रोज चर्चेत असतो. आता तालिबान लढाऊंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका अफगाण सैनिकाचा शिरच्छेद करून आपला आनंद साजरा केला आहे. वॉशिंगटन एक्झामिनरने हा व्हिडिओ घेतला आहे आणि असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ तालिबानच्या खाजगी चॅट रूममध्ये शेअर केला जात होता. मात्र, हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालिबान आणि अफगाण सैनिकाचा हा व्हिडिओ ३० सेकंदांची आहे.

या व्हिडिओमध्ये तालिबानचा मुजाहिद्दीनचा घोषणा करताना आणि हातात अफगाण सैनिकाचे शिर घेऊन परेड करताना दिसले. या व्यतिरिक्त, उर्वरित ६ लोक हातात रायफल धरून उभे दिसले. तर, दुसऱ्या सैनिकाच्या हातात दोन रक्ताने माखलेल्या चाकू होते. अहवालांनुसार, या माणसाचा गडद हिरवा ड्रेस पाहिल्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की, तो एक अफगाणी सैनिक असावा. हे तालिबानी अफगाणिस्तानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा जिंदाबादच्या घोषणाही देत ​​होते. या व्हिडिओच्या शेवटी हे तालिबानी असेही म्हणतात की, त्याला गोळी मारली गेली पाहिजे. या प्रकरणी अफगाणिस्तानचे सिक्युरिटी कंसल्टेन्ट नासिर वजीरी यांनी सांगितले की, मी तालिबानवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. दहशतवादी नेहमीच दहशतवादी असतात.

- Advertisement -

ब्रिगेडियर जनरल डॉन अफगाणिस्तानमध्ये विशेष कमांडर म्हणून पोलीस आणि लष्कराचे प्रशिक्षण बघतात. ब्रिगेडियर जनरल डॉन बोल्डक यांनी देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्हाला अशा धोकादायक दहशतवाद्यांना सामोरे जावे लागेल. हे लोक मानवतेविरुद्ध गुन्हे करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी पुढे असेही सांगितले की, तालिबानच्या छळाच्या पद्धती धोकादायक आहेत. माझ्या १० अफगाणिस्तान दौऱ्यांमध्ये, मी अशी ३ प्रकरणे पाहिली होती ज्यांचा तालिबानने शिरच्छेद केला होता. हे सर्व घृणास्पद आहे. या लोकांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आमचे पथक जात असते.


अमित शहा यांनी एका रात्रीत बदललं गुजरातच राजकारण!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -