घरदेश-विदेशतालिबानचा भारत आणि पाकिस्तानला इशारा

तालिबानचा भारत आणि पाकिस्तानला इशारा

Subscribe

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रीपदावर असलेल्या शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये शिकलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. तालिबान भारत किंवा पाकिस्तानची कोणतीही बाजू घेणार नाही. तालिबानला भारताशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत, असे शेरू म्हणून प्रसिद्ध असलेले शेर मोहम्मद यांनी म्हटले आहे. तसेच तालिबान लष्कर किंवा जैशच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानची भूमी भारताविरुद्ध वापरू देणार नाही, असेही ते म्हटले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेर मोहम्मद भारतासोबतच्या संबंधांवर बोलताना म्हणाले, ‘आमचे परराष्ट्र धोरण हे सर्व शेजारी देशांशी आणि जगाशी चांगले संबंध निर्माण करणे आहे. आम्हाला अमेरिका आणि नाटोसह चांगले संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारतासोबत सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध टिकवण्याचे प्रयत्न देखील आहे. लोकांच्या मनात तालिबान पाकिस्तानच्या संगनमताने भारताविरुद्ध शत्रुत्वाने वागेल अशी भिती आहे का? यावर शेर मोहम्मद म्हणाले, प्रसारमाध्यमांतून जे दाखवले जाते ते चुकीचे असते. आमच्या बाजूने असे कोणतेही विधान किंवा संकेत आलेले नाहीत. आम्हाला आमच्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत.

- Advertisement -

अफगाणिस्तान लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवाद्यांचा केंद्र बनले आहे, असे विचाराच त्यांनी असा दावा केला की, आमच्या संपूर्ण इतिहासात अफगाणिस्तानपासून भारतासह कोणत्याही शेजारील देशाला कोणताही धोका नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच दिवसांपासून राजकीय आणि भौगोलिक वाद आहेत यात शंका नाही. तसेच, भारत आणि पाकिस्तान त्यांच्या परस्पर युद्धात अफगाणिस्तानचा वापर करणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सीमा आहे, दोन्ही देश तेथे आपले युद्ध लढू शकतात. त्यांनी अफगाणिस्तानची भूमी वापरू नये आणि आम्ही कोणत्याही देशाला तसे करू देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दोन्ही देशांना दिला.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -