घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानची राजधानी काबुलला तालिबानचा चहुबाजूंनी वेढा

अफगाणिस्तानची राजधानी काबुलला तालिबानचा चहुबाजूंनी वेढा

Subscribe

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान (Taliban) खूप वेगाने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये (Kabul) चहूबाजूंनी घुसण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती रॉयटर्सने अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या दुजोराने दिली आहे. तालिबानने एक निवेदन जारी केले आहे की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा कोणताही हेतू त्यांचा नाही आहे. सैनिकांना काबुलमधील प्रवेश मार्गांवर उभे राहण्यास सांगितले आहे. त्यांनी काबुलमधील कोणालाही मारले नाही आहे. यापूर्वी रविवारी तालिबानने देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक नंगरहारची राजधानी जलालाबाद शहर आपल्या ताब्यात घेतले होते. यामुळे काबूल देशाच्या पूर्व भागापासून तुटले गेले आहे. आता अफगाणिस्तानच्या अशरफ गनी सरकारच्या नियंत्रणात देशातील ३४ पैकी फक्त ७ राजधान्या शिल्लक आहेत.

- Advertisement -

अशरफ गनी सरकारचे माजी वरिष्ठ सल्लागाराने जलालाबादमधल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी तालिबान प्रांतांतील नागरिकांचे नुकसान करणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे. शनिवारी अशरफ गनी यांनी अधिकाऱ्यांसोबत एक समन्वय बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. यादरम्यान त्यांना काबुल आणि शेजारी प्रांतांच्या सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली होती. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, बैठकीमध्ये यूएस चार्ज डीअफेयर्स रास विल्सन आणि अमेरिकन सैनिक कमांडर यावेळेस उपस्थित होते. या दोघांनी अफगाण सैन्याला पाठिंबा दर्शवला होता.

हेही वाचा – अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्ष , काय आहे नेमके प्रकरण?

- Advertisement -

मात्र आता अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैनिक मागे घेण्यापूर्वी तालिबान सर्व बाजूंनी देशाचा ताबा घेत आहे. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला. ज्यानंतर अफगाणिस्तानच्या सरकारवर दबाव वाढू लागला. एकाबाजूला अफगाणिस्तानमध्ये हे सर्व सूरू असताना दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा यांनी तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या राजकीय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सैन्य पाठविले आहे.


हेही वाचा – अफगाणिस्तानमधील पेचप्रसंग!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -