घरदेश-विदेशतालिबानला करायची आहे भारताशी मैत्री! जाणून घ्या केंद्र सरकारची भूमिका

तालिबानला करायची आहे भारताशी मैत्री! जाणून घ्या केंद्र सरकारची भूमिका

Subscribe

तालिबानने भारताशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी हात पुढे केला आहे. तालिबानने भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. तालिबानच्या राजवटीनंतर अफगाणिस्तानच्या राज्यकर्त्यांनी भारताच्या चिंता दूर करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी तालिबानबाबत अमेरिका आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत आणि अमेरिका अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकारांशी बोलताना, तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या शृंगला म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीनंतर ते कसे उभे राहतील हे पाहण्यासाठी या क्षणी आम्ही पाकिस्तानवर नजर ठेवून आहोत.

भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे एक महिन्यासाठी अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. या दरम्यान चार ठराव स्वीकारले गेले, परंतु अफगाणिस्तानातील तालिबान शासकांशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, कारण त्यासाठी जागतिक स्तरावर बातचीत होणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले यासह त्यांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याबाबतही आपले मत मांडले.

- Advertisement -

परराष्ट्र सचिव पुढे असेही म्हणाले की, भारताच्या निवेदनात, तालिबानला खडसावले आणि सांगितले की, कोणताही दहशतवाद होऊ नये, जो आमच्या किंवा इतर देशांच्या विरोधात असेल. तालिबान्यांनी महिला, अल्पसंख्यांक इत्यादींच्या स्थितीबद्दल जागरूक रहावे अशी आमची इच्छा आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव कॉलिन कहल यांची भेट घेतली आणि भारत-अमेरिका राजनितीक आणि संरक्षण भागीदारी पुढे नेण्यावर चर्चा केली.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -