Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी जगावर कब्जा करण्याचा तालिबानचा मानस, भारतासाठी आखला मेगा प्लॅन

जगावर कब्जा करण्याचा तालिबानचा मानस, भारतासाठी आखला मेगा प्लॅन

Subscribe

तालिबान हा शब्द ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे अफगाणिस्तान आणि काबुल. अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर तालिबानने आता संपूर्ण जगावर कब्जा करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. २०७० पर्यंत तालिबानी सैनिक अर्ध्या जगावर कब्जा करतील, असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. तर २०२९ पर्यंत भारतावरही कब्जा करणार असल्याचा दावा तालिबान्यांकडून करण्यात आला आहे.

तालिबानकडून अनेक देशांची नावं घेण्यात येत आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून या व्हिडीओची पडताळणी करण्यात येत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठे तयार करण्यात आला आणि त्याचा नेमका काय हेतू आहे. यासंबंधी गुप्तचर यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका मिनिटांपेक्षा अधिकचा आहे. त्यामध्ये दहशतवादी संघटना तालिबानचे सैनिक आपल्या हत्यारांचं प्रदर्शन करत आहेत. तसेच या व्हिडीओत जगातील कुठल्या देशावर लक्ष केंद्रीत करण्यात आलयं, त्याबाबतचा नकाशाही व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. २०२९ पर्यंत भारत, २०३२ पर्यंत इराण, २०३७ पर्यंत तुर्कमेनिस्तान, तर २०७० पर्यंत तालिबान रशियावर कब्जा करेल, असा दावा करण्यात आला आहे.

संपूर्ण व्हिडीओत जवळपास १२ देशांची नावं घेण्यात आली आहे. मात्र, या व्हिडीओत पाकिस्तानचं नाव घेण्यात आलेलं नाहीये. तालिबान सैनिक परेडच्या धर्तीवर वेगवेगळ्या देशांवर कब्जा दाखवत आहेत. परंतु हा व्हिडीओ नेमका कुठल्या दहशतवादी संघटनेने बनवला आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे.


- Advertisement -

हेही वाचा : खोकल्याची ‘ही’ औषधं मुलांना देत असाल तर सावधान! WHOने दिला इशारा, म्हणाले…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -