घरताज्या घडामोडीतालिबानी शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजईचे भारतीय लष्कराशी कनेक्शन

तालिबानी शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजईचे भारतीय लष्कराशी कनेक्शन

Subscribe

स्टेनकजई तालिबानचा राजकीय प्रमुख असून सध्या कतारची राजधानी असलेल्या दोहामधून तो राजकीय सूत्र हलवत आहे. आज स्टेनकजई जरी तालिबानचा राजकीय प्रमुख असला तरी त्याचे भारताशी जुने कनेक्शनही आहे.

अफगानिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने आता सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. काबुलमध्ये सुरू असलेले रेस्क्यु ऑपरेशन ३१ ऑगस्टला समाप्त होत आहे. त्यानंतर तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करणार आहे. यामुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान, या सत्ता स्थापनेचे मुख्य सूत्रधार असलेले काही चेहरे जगासमोर आले आहेत. यातील एकाने नुकतेच भारताशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यास तालिबान इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई असे त्याचे नाव असून कधीकाळी भारताच्या लष्कराशी त्याचे थेट कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

स्टेनकजई तालिबानचा राजकीय प्रमुख असून सध्या कतारची राजधानी असलेल्या दोहामधून तो राजकीय सूत्र हलवत आहे. आज स्टेनकजई जरी तालिबानचा राजकीय प्रमुख असला तरी त्याचे भारताशी जुने कनेक्शनही आहे. एके काळी तो अफगाणिस्तानच्या सैन्यात होता. त्याने उत्तराखंड येथील इंडियन मिलिट्री अॅकेडमी (IMA)मध्ये सैनिकी प्रशिक्षणही घेतले आहे.

- Advertisement -

परराष्ट्र संबंधांअंतर्गत IMA तर्फे डेहराडून येथे अफगाणिस्तानसह अनेक आशियाई देशांच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे सैनिक प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे. १९८० च्या सुरुवातीला स्टेनकजई हा अफगाणि लष्करात सैनिक होता. त्यावेळी त्यानेही IMA तर्फे भारतात ट्रेनिंग घेतले होते.

- Advertisement -

नंतर तो अफगाणि सैन्यातील नोकरी सोडून तालिबानमध्ये सामील झाला. राजकीय डावपेच, सैन्यदलाचा अभ्यास , परदेशी सैनिकांची लष्करी ताकद याचे स्टेनकजईला संपूर्ण ज्ञान आहे. यामुळे अल्पावधीतच त्याची वर्णी तालिबानच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये लागली आहे. अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी सोव्हियत संघाचा हस्तक्षेप वाढला आणि त्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली त्यावेळी स्टेनकजईने सैनिकपदाचा राजीनामा देऊन तालिबानचा मार्ग निवडला.

१९९६ साली तो तालिबानमध्ये सामील झाला. २००१ साली अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने प्रेवश केल्यापासून स्टेनकजई दोहामध्ये मुक्काम ठोकून आहे. इतर देशांना तालिबान्यांकडे वळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -