घरताज्या घडामोडीAfghanistan Crisis: तालिबान घाबरले! अमरुल्ला सालेह यांच्या ट्वीटनंतर पंजशीरमध्ये बंद केले इंटरनेट

Afghanistan Crisis: तालिबान घाबरले! अमरुल्ला सालेह यांच्या ट्वीटनंतर पंजशीरमध्ये बंद केले इंटरनेट

Subscribe

अफगाणिस्तावर (afghanistan) तालिबानने (taliban) कब्जा करून आज दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनपर्यंत तालिबानी अफगाणिस्तानमधल्या पंजशीरमध्ये (Panjshir) कब्जा करू शकले नाही आहेत. यादरम्यान आज तालिबानने पंजशीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Amrullah Saleh) यांनी ट्वीट करू नये म्हणून तालिबानने पंजशीरमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे, असे म्हटले जात आहे.

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून अमरुल्ला सालेह ट्वीटरवर खूप सक्रीय आहेत. तालिबानविरोधात सतत ट्वीट करत आहेत. त्यांनी शनिवारी ट्वीट केले होते की, RESISTANCE. ज्याचा अर्थ प्रतिकार असा आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये पंजशीर असे प्रांत आहे, जिथे अजूनपर्यंत तालिबान पोहोचू शकले नाही आहे. पंजशीरमध्ये तालिबानी विरोधी गट आहे. अफगाणी कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद (Ahmad Massoud) आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह पंजशीर खोऱ्यात सध्या आहेत. सध्या इथून तालिबानला आवाहन दिले जात आहे.

- Advertisement -

यापूर्वी शनिवारी तालिबानने दावा केला होता की, तालिबानी पंजशीरमध्ये घुसले आहे. परंतु अहमद मसूद यांनी हा दावा फेटाळून लावला.

१५ ऑगस्टला अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर (Kabul) तालिबानने कब्जा केला होता. ज्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून निघून गेले. त्याच दरम्यान उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहपण देश सोडून निघून गेल्याचे वृत्त समोर आले होते. पण त्यानंतर त्यांनी स्वतः ट्वीट करून देशातच असल्याचे सांगितले. सध्या अशरफ घनी युएईमध्ये आहे.


हेही वाचा – Afghanistan Crisis: भारताचा इशारा; …तर अफगाणिस्तानात लष्करी कारवाई – राजनाथ सिंह 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -