घरताज्या घडामोडीTaliban ने भारतातील आयात-निर्यात थांबवली, जाणून घ्या दोन्ही देशात कोणत्या वस्तूंचा होतो...

Taliban ने भारतातील आयात-निर्यात थांबवली, जाणून घ्या दोन्ही देशात कोणत्या वस्तूंचा होतो व्यापार

Subscribe

भारत देश हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा व्यापारी मित्र देश आहे.

दोन दशकानंतर तालिबान्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तावर ( Afganistan) ताबा मिळवला. अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर (Kabul) आक्रमण करुन काबुल देखील आपल्या ताब्यात घेतले. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आल्याने भारतातील आयती निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत (India) आणि अफगाणिस्तानमध्ये अनेक वस्तूंची आयात निर्यात सुरू आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपर्ट ऑर्गनायझेशनने (FIEO)   बुधवारी तालिबान्यांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या होत असलेली आयात निर्यात थांबवली असल्याची माहिती दिली. (Taliban stopped all imports and exports from India)  ANI ने दिलेल्या माहितीनुसार, FIEO चे डायरेक्टर जनरल डॉ. अजय सहाय यांनी तालिबान्यांनी पाकिस्तानच्या साहाय्याने मालवाहतूक रोखली आहे. त्यामुळे दोन्ही देशात होणारी आयात निर्यात थांबवण्यात आली आहे.

सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तालिबान्यांनी पाकिस्तानच्या दिशेने जाणारी मालवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आयात थांबवण्यात आली आहे.

- Advertisement -

भारत देश हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा व्यापारी मित्र देश आहे. त्याचप्रमाणे भारताची अफगाणिस्तामध्ये मोठी गुंतवणूक देखील आहे. जवळपास ४०० प्रोजेक्टवर तिथे काम सुरू आहे. भारत अफगाणिस्तामध्ये प्रामुख्याने टेक्सटाइल आणि औषधांची निर्यात करतो. तर अफगाणिस्तान भारतात सुखा मेवा आणि कांद्याची निर्यात करतो.

FIEO ने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अफगाणिस्तान हे दोन देश गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय व्यापारी देश आहे.  भारत अफगाणिस्तानला दरवर्षी जवळपास ९५ करोड डॉलरी निर्यात करतो. तर अफगाणिस्तान दरवर्षी भारताला जवळपास ६० करोड डॉलरचे सामान आयात करते.

- Advertisement -

अफगाणिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तू

मनूके, अक्रोड,बदाम,अंजीर,पिस्ता,वाळलेले जर्दाळू, औषधी जडीबूटी

भारतातून अफगाणिस्तानत निर्यात होणाऱ्या वस्तू

चहा,कॉफी,काळी मिरी, औषधे, साखर, कापूस


हेही वाचा – काबुलमध्ये विमानातून पडणाऱे ‘ते’दोघे आहेत सख्खे भाऊ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -