Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश तालिबानमुळे जगावर ९/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती, युकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा इशारा

तालिबानमुळे जगावर ९/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती, युकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा इशारा

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी संघटनेने सत्ता स्थापन करताच जगभरातील देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण तालिबान सरकारकडून अफगाणिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात दहशतीवादी हल्ले घडवले जात आहे. तर अफगाण नागरिकांना मदत करणाऱ्या देशांना धमकावले जात आहे. त्यामुळे साऱ्या जगावरच आता मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झालीत. अशातच अफगाणिस्तानमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचे मोठं केंद्रस्थान निर्माण होत आहे. यामुळे युकेच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखांनी जगातील पश्चिमी देशांमध्ये तालिबान अल कायदा दहशतवादी संघटनेप्रमाणे क्रुर हल्ले करु शकतो असा इशारा दिला आहे.

एमआय ५ चे संचालक जनरल कॅन मॅकलम यांच्या माहितीनुसार, तालिबानच्या राजवटीचा सर्वाधिक धोका आता युरोपियन देशांना निर्माण झाला आहे. कारण आता नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेले आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही सरकार अस्तित्वात नाही. मात्र दहशतवादी कारवाया एका रात्री होत नाही. त्यासाठी ट्रेनिंग कॅम्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागले. यामुळे पूर्ण प्लॅनिंगनुसार दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला जाईल.

- Advertisement -

युकेमध्ये गेल्या १० वर्षात अनेकदा दहशतवादी हल्ले होतायत. हे दहशतवादी कोणत्या ना कोणत्या विचार धारेतून प्रेरित होत या हल्ल्यांचा कट रचतायतं. यामुळे देशांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण पुन्हा अल कायदा स्टाईलने हल्ले घडवून आणण्याची शक्यता आहे. २००५ मध्ये ब्रिटनमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. ट्रेन आणि बसमधील आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामुळे एकूण ५२ लोकांचा मृत्यू झाला.

कॅन मॅकलम यांनी पुढे सांगितले की, ९/११ नंतर युकेमध्ये दहशतवादी हल्ले वाढलेत. फरक फक्त एवढाच की त्यांची तीव्रता कमी होती. मात्र, चाकू आणि बंदुकीच्या जोरावर अनेकांचा जीव घेतला जात आहे. हा इशारा जरी युरोपसाठी असला तरी अन्य देशांनीही सावध राहणे आवश्यक आहे.


Sakinaka Rape Case : चित्रा वाघ यांना अश्रू अनावर, “आम्ही भाषण, घोषणा देण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही”


- Advertisement -

 

- Advertisement -