Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतात आता तालिबानी विचार: एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न

भारतात आता तालिबानी विचार: एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करून आज चार आठवडे पूर्ण होत आहेत. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सरकारची स्थापना झाली आहे. पण यादरम्यान तालिबानने महिलावर केलेल्या अत्याचाऱ्याच्या घटना समोर येत आहेत. आता भारतात तालिबान विचारसरणी दिसणारी घटना घडली आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील हॉस्टेलच्या अधीक्षकांनी मुलींना हॉस्टेलच्या आतमध्ये बुरखा घालण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानंतर मुलींनी हंगामा केला असून प्रकरण इतके तापले की, हॉस्टेलच्या गेटवर दगडफेक झाली. यानंतर मंडळ अधिकारी स्मिता झा यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत केले.

हॉस्टेलमधील मुलींनी अनेक आरोप अधीक्षकांवर लावले आहेत. एका मुलीने सांगितले की, जेव्हा हॉस्टेलमध्ये मुली पॅन्ट घालायच्या तेव्हा मुलींना अधीक्षक खूप शिव्या द्यायचा. पालकांना फोन करून चुकूची माहिती देत असे. एका पीचडी स्कॉलरने सांगितले की, गरमीच्या दरम्यान प्रत्येक वेळेस बुरखा घालणे सोपे नाही आहे. यामुळे मुली हॉस्टेलमध्ये पायजमा घालतात, परंतु अधीक्षक सांगतात की, इथे नेहमी बुरखा घालायला पाहिजे.

- Advertisement -

मुलींना बुरखा घालण्याचे आदेश देण्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. मंडळ अधिकारी स्मिता झा यांचे म्हणणे आहे की, हॉस्टेलमधील मुली आणि अधीक्षकांचा जबाब घेण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच हा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना सादर केला जाईल.


हेही वाचा – Taliban: तालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध


- Advertisement -