Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश तालिबान्यांची क्रूरता, गर्भवती महिलेवर थेट गोळ्या झाडल्या, दुसरीचे डोळे काढले

तालिबान्यांची क्रूरता, गर्भवती महिलेवर थेट गोळ्या झाडल्या, दुसरीचे डोळे काढले

शांततेचा देखावा फसवा, अफगाण महिला संकटात

Related Story

- Advertisement -

महिला सुरक्षा आणि अधिकारांबाबत तालिबानकडून कितीही आश्वासनं दिली जात असली तरीही तालिबान्यांचा खरा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. या तालिबान्यांनी एका गर्भवती महिलेला गोळ्या झाडून मारले, तर दुसरीचे अत्यंत निर्दयीपणे डोळे काढून घेतले. या अत्याचाराच्या घटनांमुळे अफगाणमधील महिला प्रचंड दहशतीत असून, या महिलांच्या सुरक्षेचे जगासमोरही मोठे संकट उभे ठाकलेय.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान महिलांच्या अधिकारांना जपणार असल्याची ग्वाही तालिबान्यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती भयावह आहे. अशाच एका प्रकारात तालिबान्यांनी घोर प्रांतातल्या फिरोजकोहमधील एका ६ महिन्याच्या गर्भवती पोलीस अधिकारी महिलेला गोळ्या घालून मारलं. एवढ्यावर न थांबता या हैवानांनी तिचा चेहराचही विद्रूप केला. दुर्दैव म्हणजे हा सर्व प्रकार त्या महिलेचा पती आणि तिच्या लहान मुलांसमोर केला. महिलांना कोणतेही अधिकार नसतील, हे दाखवण्यासाठी तालिबान्यांनी क्रूरतेची ही पातळी गाठली.

दिल्लीत उपचार, मात्र डोळे गमावले

- Advertisement -

अफगाणिस्तानमधील गझनी शहरातील एका घटनेत खटेरा नावाच्या ३३ वर्षीय महिलेचेही तालिबान्यांनी हाल केले. ही ३३ वर्षे वयाची महिला कामावरुन घराकडे परतत असताना तालिबान्यांच्या टोळक्यानं तिला अडवलं आणि भोसकलं. तिचे डोळेही तालिबान्यांनी काढले. तिच्यावर अनेक वार केले. ही महिला कशीबशी दिल्लीत पोहोचली. तिच्यावर उपचार झाले मात्र दुर्दैवाने तिचे डोळे कायमचे गेले.

महिला म्हणजे केवळ मांसाचा तुकडा

तालिबानच्या दृष्टीने महिला म्हणजे केवळ मांसाचा तुकडा आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करता येतो. तालिबानी आधी अत्याचार करतात, कधी कधी मृतदेह चौकांत लटकवतात. तर, कधीकधी महिलांचे मृतदेह कुत्र्यांनाही खायला देतात, अशी भीषणता दिल्लीत उपचार घेत असलेल्या महिलेने वर्णन केली. तालिबान्यांच्या भीतीपोटी महिला आपलं शैक्षणिक प्रमाणपत्र जाळताहेत. जेणेकरुन तालिबान्यांना शिक्षणाचा पुरावा मिळणार नाही. काबूलमध्येच नव्हे तर गावांमध्येही असेच अत्याचार सुरू असल्याचे त्या महिलेने सांगितले.

- Advertisement -