घरCORONA UPDATELockdown- आर्थिक संकट कलाकारांवरही, अभिनेता-अभिनेत्रीची आत्महत्या!

Lockdown- आर्थिक संकट कलाकारांवरही, अभिनेता-अभिनेत्रीची आत्महत्या!

Subscribe

गेल्या महिन्यातच 'क्राइम पेट्रोल'मधील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सिनेसृष्टीला बसला आहे. नाटक, मालिका, सिनेमा यांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे याचा परिणाम चित्रपट कामागारांबरोबर कलाकारांवरही होऊ लागला आहे. दोन महिने शूटींग बंद असल्यामुळे कलाकारांनाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. हीच आर्थिक टंचाई सहन झाल्यामुळे प्रसिद्ध तमिळ अभिनेता श्रीधर आणि त्याची बहीण अभिनेत्री जया कल्याणी या दोघांनी आत्महत्या केली.

चेन्नईतील त्यांच्या घरात दोघांचेही मृतदेह आढळले. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनच्याकाळात शूटिंग बंद असल्यानं आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळं नैराश्येतून दोघांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. श्रीधर आणि त्याची बहीण जया कल्याणी या दोघांनी आयुष्य संपवलं आहे. चेन्नईतील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

चेन्नईतील राहत्या घरात श्रीधर आणि जया कल्याणी या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. बंद घरातून दुर्गंधी येत असल्यामुळं त्यांच्या शेजारच्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर, घराचा दरवाजा उघडला. आतमध्ये दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी तातडीने दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या दोघांनी आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या महिन्यातच ‘क्राइम पेट्रोल’मधील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन तिनं जीवन संपवलं होतं. मृत्यूपूर्वी तिनं चिठ्ठी लिहून ठेवली होती. लॉकडाउनमध्ये काम न मिळाल्यामुळं प्रेक्षाला नैराश्य आलं होतं. याआधी अभिनेता मनमीत ग्रेवालनेही त्याच्या नवी मुंबई येथील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

- Advertisement -

हे ही वाचा – एका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -