घरCORONA UPDATEमद्यपींची झुंबड टाळण्यासाठी तामिळनाडूत रंगीत टोकन

मद्यपींची झुंबड टाळण्यासाठी तामिळनाडूत रंगीत टोकन

Subscribe

दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर देशात काही ठिकाणी मद्याची दुकाने उघडली. त्यानंतर मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर चांगलीच गर्दी केली. या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ बरेच दिवस अनेक माध्यमात चर्चेचा विषय ठरले होते. तामिळनाडू राज्यातही मद्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत होत्या. त्यावर तामिळनाडूच्या मद्याच्या दुकानांनी आगळावेगला पर्याय शोधला आहे. तो म्हणजे रंगबीरंगी टोकनचा. तामिळनाडू राज्य मार्केटिंग कॉर्पोरेशनने ही नवीन टोकन पद्धत मद्यपींसाठी शोधून काढली आहे.

ज्यांना मद्य विकत घ्यायचे आहे, त्यांना हे टोकन दिले जाते. रविवार ते शनिवार अशा सात दिवसांसाठी सात वेगवेगळ्या रंगाची टोकन काढली आहेत. मद्यपीला ज्या दिवशी मद्य घ्यायचे आहे. त्या दिवसाच्या रंगाचे टोकन दिले जाते. त्यावर एक वेळ निश्चित केलेली असते, त्याच वेळेला मद्यपी मद्य विकत घ्यायला येऊ शकतो. या टोकनवर मद्याच्या दुकानाचा पत्ताही छापलेला असतो, जेणेकरुन मद्यपी त्याच विशिष्ट दुकानावर जाऊन मद्य घेऊ शकेल.

- Advertisement -

मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूमधील मद्य विक्रीवर बंदी घालण्यास सांगितले होते, त्यानंत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाला स्थिगिती दिली होती. त्यानंतर ही नवीन टोकन पद्धत काढण्यात आली. तब्बल ४३ दिवसांच्या बंदीनंतर तामिळनाडू राज्यात ७ मे पासून चेन्नई वगळता इतर ठिकाणी मद्य विक्रीस परवानगी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ८ मे रोजी मद्रास हायकोर्टाने गर्दी होत असल्यामुळे मद्य विक्रीवर बंदी आणली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -