Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशTamil Vs Hindi : दुसऱ्या भाषा युद्धासाठी तयार, हिंदीला विरोध दर्शवत एम के स्टॅलिन यांचा इशारा

Tamil Vs Hindi : दुसऱ्या भाषा युद्धासाठी तयार, हिंदीला विरोध दर्शवत एम के स्टॅलिन यांचा इशारा

Subscribe

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेतृत्वाखालील केंद्र तसेच तामिळनाडू सरकारमधील वादाचा विषय असलेल्या त्रिभाषिक धोरणावर बैठकीत चर्चा होईल का, असे विचारले असता, स्टॅलिन म्हणाले की, एनईपी, केंद्रीय निधी आणि नीट (NEET) यासारख्या मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांचे पुरेसे संख्याबळ आवश्यक आहे.

(Tamil vs Hindi) चेन्नई : तामिळनाडू सरकारने हिंदी भाषाविरोधाची धार आणखी तीव्र केली आहे. राज्य ‘दुसऱ्या भाषा युद्धा’साठी तयार असल्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी सांगितले. केंद्र सरकार आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमचे पैसे रोखत आहे. पण आम्ही 2000 कोटी रुपयांसाठी आमचे हक्क सोडणार नाही; अन्यथा तामिळ समाज 2000 वर्षे मागे जाईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा हिंदी भाषाविरोधी भूमिका मांडताना, हिंदीमुळे तामिळ भाषा संपुष्टात येईल, असा इशारा दिला होता. (MK Stalin warns state ready for language war)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवल्याने लोकसंख्या नियंत्रणात आली आहे. परिणामी आठ जागा गमावण्याचा धोका तामिळनाडूला आहे. त्याअनुषंगाने लोकसभा सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 5 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी केद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना आमंत्रित केले जाईल, असे सांगून त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकतेचे आवाहन केले.

हेही वाचा – Sajjan Kumar : काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षा, नेमके प्रकरण काय?

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेतृत्वाखालील केंद्र तसेच तामिळनाडू सरकारमधील वादाचा विषय असलेल्या त्रिभाषिक धोरणावर बैठकीत चर्चा होईल का, असे विचारले असता, स्टॅलिन म्हणाले की, एनईपी, केंद्रीय निधी आणि नीट (NEET) यासारख्या मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांचे पुरेसे संख्याबळ आवश्यक आहे. सीमांकनाच्या नावाखाली दक्षिणेकडील राज्यांवर टांगलेली तलवार आहे. सर्व विकास निर्देशांकांमध्ये राज्य आघाडीवर होते, परंतु आता सीमांकनानंतर, लोकसभेच्या 8 जागा गमावण्याचा धोका दिसत आहे, कारण ही प्रक्रिया राज्याच्या लोकसंख्येवर आधारित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी, आमचे खासदार 39ऐवजी फक्त 31 असतील. अशाने आमचे प्रतिनिधित्व कमी होईल. तामिळनाडूचा आवाज दाबला जात आहे, असे ते म्हणाले.

केंद्राकडून कथितरीत्या हिंदी भाषा लादली जात असल्याचे लक्षात घेता, आणखी एका भाषा युद्धाची बीजे रोवली जात आहेत का, असे विचारले असता, स्टॅलिन यांनी, “हो, नक्कीच,” असे सांगत आम्ही त्यासाठी तयार असल्याचे म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut : पापांचा कडेलोट झाल्यामुळे शिंदे प्रयागराजला गेले, राऊतांची घणाघाती टीका