Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश तामिळनाडूमध्ये DMK ला बहुमत; शरद पवारांनी स्टॅलीन यांचं केलं अभिनंदन

तामिळनाडूमध्ये DMK ला बहुमत; शरद पवारांनी स्टॅलीन यांचं केलं अभिनंदन

Related Story

- Advertisement -

तामिळनाडू विधानसभेचा सुरुवातीचे निकाल समोर आले आहेत. आता जे कल समोर आले आहेत, त्यानुसार तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार असल्याचं स्पष्ट आहे. यामध्ये DMK पक्षाने १५० जागांसह आघाडी घेतली आहे. या विजयासाठी DMK चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत एम. के. स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. आताच्या कलानुसार DMK ला १५० जागा मिळाल्या आहेत. तर ज्यांची तामिळनाडूमध्ये सत्ता होती त्या AIADMK पक्षाला ८३ जागा मिळाल्याचं दिसतंय.

- Advertisement -

बंगालमधील विजयाबद्दल शरद पवारांकडून ममतादीदींचं अभिनंदन

बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisement -